School esakal
नाशिक

Nashik ZP School : पेठमध्ये 109 पदे रिक्त! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

रखमाजी सुपारे

पेठ : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक अशी ६१८ पदे मंजुर आहेत . त्यात मुख्याध्यापक २८ पदे मंजुर असून २० पदे रिक्त आहेत तर ८ पदांवर मुख्याध्यापक कार्यरत आहेत. पदवीधर शिक्षकांची १०० पदे मंजुर असून ४३ पदे रिक्त असून ५० पदवीधर कार्यरत आहेत.

उपशिक्षकांची ४९० पदे मंजूर असून ४६ पदे रिक्त आहेत . सध्या तालुक्यात ५०९ शिक्षक कर्मचारी कार्यरत असून १०९ शिक्षक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने तालुक्यातील ७४ शाळांवर शिक्षकांची उणीव असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. (Nashik ZP School 109 Vacancies in Peth)

पेठ तालुक्यात १ ते ८ वी पर्यंत जिल्हा परिषदचे १८९ शाळा असून खासगी व्यवस्थापनाचे ४१ शाळा ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत . दुर्गम अतिदुर्गम वाड्या-पाड्यावरील सुमारे १५ हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे गिरवित असून खासगी शाळेत सुमारे ४५०० शिक्षण घेतात.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १८९ शाळांच्या इमारतीची स्थिती बऱ्यापैकी असून किरकोळ डागडुजी दरवाजे खिडक्यांना कडी कोंयडा लावणे, छतावरील फुटलेली कौले बदलणे अथवा फुटलेला पत्रा बदलणे, छतावरील पालापाचोळा साफ करणे जेणेकरुन पावसाच्या पाण्याने शाळा गळकी होणार नाही याची दक्षता घेणे कामी सर्व मुख्याध्यापकांना सुचित करण्यात आले आहे.

नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थांची गावातून मिरवणूक काढणे, त्यांचे औक्षण करणे, त्यांच्या पायांचे ठसे घेणे, शाळा सजवणे, रांगोळी काढणे, पहिल्या दिवशी पुस्तके वाटप करणे, जेवणात गोड पदार्थ देणे याबाबत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. समग्र शिक्षा योजनेमधून दरवर्षी पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पाठयपुस्तके वाटप केली जातात. (latest marathi news)

यावर्षी पेठ तालुक्यातील १९ हजार ५१२ विद्यार्थ्यांसाठी ८० हजार ४५४ पुस्तके प्राप्त झाली आहेत. शाळा स्तरावर १५ जूनला प्रवेशोत्सव साजरा करून मुलांना पुस्तके वाटप करण्यात येतील. ८० हजार मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झाले असून गट स्तरावरून केंद्रस्तर व केंद्र स्तरावरून शाळा स्तरापर्यंत वाटप झाले आहे.

"नव्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणारे सर्व उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्य पूर्ण उपक्रम मॉडेल स्कूल, स्पेलिंग बी, मॅथ बी यावर भर देऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत .जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे."

- प्रशांत जाधव, गटशिक्षणाधिकारी, पेठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागली; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT