Nashik ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने ३४ जिल्हा परिषदेतील १२ हजार ५२२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेतही मार्चमध्ये भरती प्रक्रिया पार पडली. मात्र शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील तब्बल ९१२ शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे भरतीनंतरही ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची अथवा एकच शिक्षक राहण्याची शक्यता आहे. (Nashik Even after recruitment ZP 912 posts of teachers are vacant)
जिल्हा परिषदेच्या जवळपास तीन हजार २६६ शाळा असून, यात दोन लाख ७८ हजार ७९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी चार हजारांवर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक हजार ३४ पदे रिक्त होती. यातील २२२ पदे भरण्यात आली. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा या एक शिक्षकी झाल्या आहेत. भरती प्रक्रियेत २२२ पदे भरली गेली.
यातही ही पदे बिगरआदिवासी तालुक्यांना मिळाल्याने वर्षोनुवर्षे रिक्त पदांचा बॅकलॉग यानिमित्त भरला गेला आहे. यातून शिक्षण विभागाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाची चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी शासनाने निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. परंतु या नियुक्तीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पेसा तालुक्यातील भरतीत ३३० शिक्षक मिळाले असते. परंतु, ही भरती प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे आदिवासी तालुक्यांना शिक्षक मिळू शकलेले नाहीत. (latest marathi news)
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविताना शासनाचे रिक्त पदांच्या ७० टक्केच्या मयदित शिक्षकांची भरती करण्यास परवानगी दिली. जिल्ह्यात एक हजार ३४ पदे रिक्त असताना २२२ शिक्षकांचीच भरती करण्यात आली. ७० टक्के भरती का करण्यात आली नाही, असा प्रश्न निर्माण झाला
जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांची संख्या मात्र कमी आहे. जिल्हा बदलीने नाशिक जिल्ह्याला १२२ शिक्षक येणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ८० शिक्षक जिल्ह्यात येणार आहे. तब्बल ३२ शिक्षक कमी मिळणार आहे.
पटसंख्येवर परिणाम
शिक्षकांची एक हजार ३२ पदे रिक्त आहेत. यात बिगरआदिवासी तालुक्यांमधील नांदगाव (१३१), येवला (६७), चांदवड (५५), मालेगाव (८६), बागलाण (४८) या तालुक्यांत रिक्त पदाची संख्या तुलनेने मोठी होती. मात्र शिक्षक भरतीतून या तालुक्यांना शिक्षक भरण्यात आले. त्यानंतरही ९१२ पदे रिक्त आहेत. शिकविणारेच अपुरे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.