Nashik ZP News esakal
नाशिक

Nashik ZP School : जि. प. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तीवाढीसाठी सराव चाचण्या; प्राथमिक शिक्षण विभागाचा उपक्रम

ZP School : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्राथमिक शिक्षक विभाग सरसावला असून, विभागातर्फे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यातंर्गत सराव चाचण्या घेण्याचा निर्णय विभागाने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP School : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्राथमिक शिक्षक विभाग सरसावला असून, विभागातर्फे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यातंर्गत सराव चाचण्या घेण्याचा निर्णय विभागाने केला आहे. शाळांमध्ये तीन स्तरावर या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबवित असलेल्या या उपक्रमाची जबाबदारी शिक्षक संघटनांवर सोपविण्यात आली आहे. संघटनांनी शिक्षकांना सहभागी करून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जि.प. शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी केले. ( Practice tests for quality improvement of students )

जिल्हाभरात अनेक शिक्षक संघटना कार्यरत असून, त्यांच्या प्रश्नांसाठी या संघटना शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी येत असतात. कायम प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक संघटनांवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीची जबाबदारी देण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी विविध शिक्षक संघटनांसमवेत शैक्षणीक संवाद बैठक झाली. शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हयाचा शैक्षणिक आढावा सर्व संघटना प्रतिनिधी पुढे सादर केल्या.

संघटनांसोबत गुणवत्ता वाढीसाठी झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात तीन पातळीवर भाषा व गणित विषयाची चाचणी होणार असून या माध्यमातून अप्रगत मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये पायाभूत चाचणी, नोव्हेंबरमध्ये मध्य चाचणी तर मार्च २०२५ मध्ये अंतिम चाचणी घेतली जाणार आहे. प्रथम चाचणी शिक्षक वर्ग बदलून, दुसरी चाचणी केंद्रातंर्गत शिक्षक बदल करून व तिसरी चाचणी स्वतः शिक्षक घेतील.

या माध्यमातून अप्रगत मुलांना पुढील सहा महिन्यांमध्ये प्रगत करून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन डॉ. बच्छाव यांनी केले. एफ एल एन कार्यक्रमाला पोषक हा उपक्रम असून वेळोवेळी त्यासाठी आवश्यक परीक्षा घेतल्या जातील. वर्षा अखेरीस जिल्ह्याच्या गुणवत्ता आलेख उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे प्रमुख म्हणून कटिबध्द असल्याचे डॉ. बच्छाव यांनी स्पष्ट केले.(latest marathi news)

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधावा यासाठी वारंवार मागवल्या जाणाऱ्या माहितीच्या बाबतीत देखील आढावा घेऊन माहिती कमीत कमी मागण्याच्या बाबतीत देखील अभ्यास करून त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्ता ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. गुणवत्ता वाढीच्या प्रत्येक उपक्रमासाठी शिक्षक संघाचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा राहील असे संघटनेच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत झालेली चर्चा

- केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नत्या दोन आठवडयात केल्या जातील

- विनंती बदली प्रक्रीया ३० जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल

- विज्ञान पदवीधर जागेवर कार्यात बारावी सायन्स शिक्षकांना विनंती बदली प्रक्रियापूर्वी पदस्थापना

-निवड श्रेणी व चटोपाध्याय जिल्हास्तरावर प्राप्त प्रस्ताव कार्यवाही सादर

- मुख्याध्यापक पदोन्नती व विनंती बदलीपूर्वी शिक्षक संघटनांसोबत पुन्हा बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT