Nashik ZP School News esakal
नाशिक

Nashik ZP School : जुलै उजाडूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP School : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तीन लाख विद्यार्थी जुलै उजाडला तरी गणवेशापासून वंचित आहेत. शिक्षण विभागाने गणवेशाची मागणी नोंदवूनही शासन स्तरावरून नवीन गणवेश मिळालेले नाहीत. गणवेश मिळाला नसला, तरी बूट, मौजे यांचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. (ZP School Students deprived of uniform)

शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील ३२०० प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांना गोड खाऊ देत विद्यार्थ्यांचे मिरवणुका काढत स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नंतर बूट व मौजे यांचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळालेले नाहीत. मागील वर्षी झालेल्या गोंधळामुळे गणवेश वाटपात बदल करण्याचा निर्णय घेत एकाच रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय झाला.

त्यासाठी शासन स्तरावरून कापड दिले जाणार असून, तालुका स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांच्या माध्यमातून गणवेशाची शिलाई करण्याचे निश्चित झाले होते. यात कापडच तालुकास्तरावर पोचले नाहीत. शाळा सुरू होण्याच्या दोन दिवसपूर्वी शासनाने गणवेश शिलाई करून देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, शाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत आला आहे. (latest marathi news)

अद्यापही शासन स्तरावरून गणवेश प्राप्त झालेले नाहीत. नाशिक जिल्ह्याला गणवेशाची प्रतिक्षा असताना, इतर जिल्ह्यांना गणवेश मिळाले आहेत. मात्र, मिळालेल्यागणवेशांबाबत मोठ्या तक्रारी शासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. गणवेश विद्यार्थ्यांना येत नाही, त्याचे माप चुकले आहे, अशा तक्रारी सुरू झाल्या आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नवीन गणवेश शाळांपर्यंत पोचू न शकल्याने विद्यार्थ्यांवर जुन्याच गणवेशात धडे गिरवण्याची नामुष्की आली आहे.

विभागीय आयुक्तांनाही घेतली दखल

विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी जिल्हा परिषदेत येत प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा घेतला. आढाव्यात विद्यार्थ्यांना नवीन गणवेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर विभागीय आयुक्त गेडाम यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करू, लवकरात लवकर गणवेश मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT