ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik ZP Schools: 343 वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती; जिल्‍ह्यात 267 नवीन वर्गखोल्यांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Schools : जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, खडबडून जागा झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २६७ नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्या असल्याचे सांगितले.

३४३ वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी प्रशासकीय मान्यता तसेच कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सांगितले.

एकूण ६१० वर्गखोल्या होणार असून, ३३ शाळांमधील वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव दाखल झाल्याचेही फुलारी यांनी स्पष्ट केले. (Nashik ZP Schools 343 classrooms to be renovated 267 new classrooms sanctioned in district)

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यापेक्षाही स्मार्ट व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. भौतिक सुविधांसाठी ‘गावची शाळा- आमची शाळा’ हा उपक्रम सुरूच ठेवला.

परंतु, अपुऱ्या निधीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार २६१ शाळा असून, यात सुमारे दोन लाख ७८ हजार ७९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मात्र, यातील ४४१ शाळांची दुरवस्था झाली असल्याची माहिती युडायसवर भरण्यात आलेल्या माहितीतून समोर आली. ही माहिती प्रसिद्ध झाल्यावर प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा नादुरुस्त असल्याचे मान्य केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु, जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीतून २६७ नवीन वर्गखोल्यांना मंजुरी मिळाली आहे. तसेच, दुरुस्तीसाठी प्राप्त झालेल्या निधीतून ३४३ वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जाईल. नवीन वर्गखोल्यांची प्रशासकीय मान्यता होऊन कार्यारंभ आदेशही निर्गमित झालेले असल्याचे शिक्षणाधिकारी फुलारी यांनी सांगितले.

याशिवाय, जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३३ शाळांमधून वर्गखोल्या निर्लेखनाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यात नांदगाव (५), पेठ (२), सिन्नर (११), त्र्यंबकेश्वर (४), नाशिक (६), बागलाण (५) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT