Rangpanchmi 2024 : पेशवेकालीन रहाडींमध्ये धप्पा घेताना अन् रिमझिम शॉवर्सखाली संगीताच्या तालावर थिरकताना नाशिककरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. शनिवारी (ता.३०) सर्वच रहाडींभोवती नागरिकांनी गर्दी केली होती. यासोबत रामतीर्थ व म्हसोबा पटांगणावरही गोदावरीत मोठ्या संख्येने डुबकी घेताना तप्त उन्हापासून दिलासा मिळविला. नाशिककरांचा उत्साह पाहता, आयोजक संस्थांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. (Nashikkar enjoy Rangpanchami while taking jumped in rahad )
जुनी तांबट लेन, मधली होळी, नावदरवाजा तसेच शनी चौक, तिवंधा अशा सर्वच रहाडींमध्ये धप्पा मारताना नाशिककरांनी परंपरा जपली. दुपारी दोनला विधीवत पूजन झाल्यानंतर रहाडी नाशिककरांसाठी खुल्या करण्यात आल्या. सायंकाळी पाचपर्यंत या सर्वच रहाडींभोवती गर्दी कायम होती.
तसेच जुने नाशिक भागात साक्षी गणेश मंदिर चौक, मेनरोड, नावदरवाजा यासह इतर ठिकाणी रेनडान्स अन् संगीत व्यवस्था केलेली होती. डीजे तसेच पारंपारिक वाद्यांवर ठेका धरताना तरुणाईने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. रंग खेळून झाल्यानंतर रामतीर्थ तसेच म्हसोबा पटांगण येथे गोदावरीमध्ये डुबकी घेण्यासाठी नाशिककरांनी आपली पावले वळवली.
खासदार, आमदारांसह अधिकाऱ्यांना रहाडींची भुरळ...!
खासदार हेमंत गोडसे यांनी रहाडींना भेट देत रंगोत्सवात सहभाग नोंदविला. तसेच आमदार ॲड.राहुल ढिकले यांनीही शनी चौकातील रहाडीत धप्पा घेताना रंगोत्सवाचा आनंद लुटला. इतरही राजकीय मंडळीमध्ये रंगोत्सवाचे रंग चढलेले बघायला मिळाले. दुसरीकडे अधिकारी वर्गातही रंगपंचमीची भुरळ कायम होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह इतर अधिकारी वर्गाने रंगाची उधळण करतांना या सणाचा आनंद लुटला. (latest marathi news)
बंदोबस्तात सण साजरा
रहाडींभोवती सीसीटिव्ही , खासगी सुरक्षारक्षकांसमवेत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलेला होता. साध्या वेशात पोलिस गर्दीमध्ये उपस्थित होते. तसेच दामिनी पथकाकडूनही करडी नजर ठेवली जात होती. कडक बंदोबस्तात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
नैसर्गिक रंगांचा रहाडींमध्ये वापर
सालाबादाप्रमाणे रहडींमध्ये नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला होता. जुनी तांबट लेन, मधली होळी आणि नावदरवाजा येथे केशरी रंगाचा वापर करण्यात आला होता. तर जुने नाशिक भागातील रहाड पिवळ्या रंगाने रंगली होती. शनी चौक आणि तिवंध्यातील रहाडीत गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.