Statement showing opposition to Panjarpol place Municipal Commissioner Dr. Giving to Chandrakant Pulkundwar esakal
नाशिक

Nashik News : पांजरपोळ वाचविण्यासाठी नाशिककर सरसावले; पन्नासहून अधिक संघटनांचे आयुक्तांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भविष्यात नाशिकसाठी ऑक्सिजन ठरणारा पांजरपोळ येथील जवळपास ८२५ एकर जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास विरोध करण्यासाठी नाशिकमधील पर्यावरणप्रेमी व संघटना सरसावल्या आहेत. जवळपास पन्नासहून अधिक संघटनांच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांकडे विरोधाचे निवेदन सोमवारी (ता.२७) सादर केले. (Nashikkar rushed to save Panjarpol Statement of more than fifty organizations to commissioner Nashik News)

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पांजरपोळची जागा ताब्यात घेऊन त्या जागेवर अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची मागणी आहे. कधी जागेचे प्रकरण शांत होते तर कधी उचल खाल्ली जाते. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उद्योजकांच्या मागणीचा आधार घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे बैठक लावली.

द्विसदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली. समितीने पंधरा दिवसात अहवाल सादर करावा अशा सूचना आहेत. त्यात पांजरपोळच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर वृक्ष व जिवविविधतेची माहिती अहवालात नमुद करण्याच्या सूचना आहेत.

परंतु एकीकडे शासनाने पांजरपोळची जागा ताब्यात देण्यासाठी समिती गठित केली असताना दुसरीकडे पांजरपोळची जागा देण्यास नागरिक, संस्था सरसावल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील विरोध दर्शविला महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना आज निवेदन देण्यात आले.

गिव्ह वेल्फेअर असोसिएशन, राह फाउंडेशन, वृक्षवल्ली फाउंडेशन, ब्रम्हगिरी कृती समिती, बिजांकुर ग्रुप, नेचर क्लब ऑफ नाशिक, निसर्गसेवक युवा मंच, विजयश्री सेवा संस्था, गरुड झेप प्रतिष्ठान, मानव उत्थान मंच, जैन संस्था, वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था, सिद्धीसाई नागाई बहुद्देशीय संस्था, संयुक्त वनव्यवस्थापन समिती बेलगांव ढगा, आपलं पर्यावरण संस्था, दरीमाता वृक्षमित्र परिवार, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, हिरवांकुर फाउंडेशन, पक्षी मित्र मंडळ, नाशिक ट्रेकर्स, डेक्कन ट्रेकर्स, गोपालक वेल्फेअर असोसिएशन, ग्रीन रेव्हेल्युशन, लोक श्रमश्रया संस्था, पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंच, नवनाथ पंथीय सामाजिक बहुउद्देशीय संस्था, रामकृष्ण नरहरी सेवाभावी संस्था, प्रेम फाउंडेशन, एनजीओ फोरम, मंगलग्रुप गोशाला, कपिला नदी संवर्धन समिती, कुंभसेवा समिती आदींनी निवेदन दिले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

फुफुस्से अबाधित ठेवा

चुंचाळे, बेळगाव ढगा, सारूळ या भागाला लागून पांजरपोळचे क्षेत्र असून नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी म्हणून हा भाग ओळखला जातो. शहरात प्रदूषण वाढतं असताना जंगलसदृश्य भागात औद्योगीकरण करणे योग्य नाही.

पांजरपोळ सारख्या जास्तीत जास्त जागा शहराची फुफ्फुसे म्हणून बायो डायव्हर्सिटी झोन म्हणून घोषित होणे आवश्‍यक आहेत. असे निवेदनात म्हटले आहे. त्याउलट नाशिक शहरात दरडोई जितके वृक्ष हवेत त्याहूनही त्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

पांजरपोळमधील जैवविविधता

- जवळपास अडीच लाख झाडे.

- २७ रेन वॉटर हार्वेस्टिंग शेततळी.

- पशुपक्ष्यांचे निवासस्थान.

- राष्ट्रीय पक्षी ३०० मोरांचे नंदनवन.

- १४०० गायींची गोशाळा व गांडूळखत प्रकल्प.

- ४५० किलोवॅट चा सौर विद्युत निर्मिती प्रकल्प.

- मधमाशी पालन प्रकल्प.

- पर्यटन संचालनालयकडे एकदिवसीय सहल केंद्र म्हणून नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT