Pramod Jadhav, Anna Patil, Chandrakant Bankar etc. during a colorful fight on Sunday at the inauguration of the 17th National Fencing Tournament. esaka
नाशिक

National Fencing Competition : हर्षवर्धन, श्रेयस, वैदेहीसह गायत्री, यशश्रीची आघाडी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील जिल्हा तलवारबाजी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्यातर्फे स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुलात कॅडेट गटाच्या १८ वर्षे वयोगटांच्या सतराव्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. ११) स्‍पर्धेच्‍या उद्‌घाटनानंतर महाराष्ट्राच्‍या हर्षवर्धन औताडे, श्रेयस जाधव यांनी, तर मुलींमध्ये वैदेही, अंकिता सोळंकी, गायत्री गोरे, यशश्री वंजारे यांनी पहिल्‍या फेरीत चांगली कामगिरी केली आहे. (National Fencing Competition Harshvardhan Shreyas Vaidehi along with Gayathri Yashshree lead Nashik News)

रविवारी खेळल्या गेलेल्या मुलांच्या सॅबर या वैयक्तिक प्रकारात एसएससीबी आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करताना पहिल्या फेरीत यश मिळविले आहे. तर हरियाना, मणीपूर, जमू-काश्मीरच्या खेळाडूंनीही चांगला खेळ करून पहिल्‍या फेरीत आघाडी घेतली.

मुलींच्या फॉइल प्रकारात महाराष्ट्राच्या वैदेही, अंकिता सोळंकी, गायत्री गोरे आणि यशश्री वंजारे यांनी प्राथमिक फेरीमध्ये चांगला खेळ करून अनुक्रमे २८, २०, ७ आणि २२ गुण मिळविले आहेत. मुलांच्या ई. पी. प्रकारात महाराष्ट्राच्या सोहम शेटे आणि यश वाघ यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

स्पर्धेचे उद्‍घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव प्रमोद जाधव, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोगल, छत्रपती पुरस्कारप्राप्त आनंद खरे, फेन्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. उदय डोंगरे उपस्‍थित होते. बुधवार (ता. १४)पर्यंत ही स्‍पर्धा पार पडणार आहे.

चौदाशे खेळाडूंचा सहभाग

स्पर्धेत देशभरातून एक हजार ४७८ खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या सुटसुटीत आयोजनासाठी ९० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पंच, तांत्रिक अधिकारी कार्यरत आहेत. खेळाडूंची निवासव्यवस्था क्रीडासंकुल, जनार्दन स्वामी आश्रम, भक्तिसंकुल आणि भोजनव्यवस्था क्रीडासंकुलात केलेली आहे. स्पर्धेचे संपूर्ण चित्रीकरण फेसबुकवर थेट लाइव्ह उपलब्‍ध केलेले आहे.

आंतरराष्ट्रीय स्‍पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड

राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिले आठ संघ मध्य प्रदेश येथे आयोजित होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

रविवारी झालेल्‍या स्‍पर्धेचा निकाल-

- मुले वैयक्तिक सॅबर– ए. यू. अल्लिन (एसएससीबी) विजयी विरुद्ध प्रखर सिंघ (राजस्थान) (१०-०१).

अनमोल शर्मा (पंजाब) विजयी विरुद्ध सुरेनदार कुमार (हरियाना) (१०-०७).

प्रणव नोरील (चंडीगड) विजयी विरुद्ध हरी रेड्डी (तेलंगणा)(१०-०९).

सूयश शर्मा (जम्‍मू-काश्मीर) विजयी विरुद्ध अठोकपाम थोइनाओ (मणिपूर) (१०-०७).

हर्षवर्धन औताडे (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध हरीमन गारथी (चंडीगड) (१०-०७)

श्रेयश जाधव (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध विकास गुर्जर (राजस्थान) (१०-०१)

अनिल दीपक (हरियाना) विजयी विरुद्ध आदित्य वाव्हळ (महाराष्ट्र) (१०-०५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT