National Peoples Court esakal
नाशिक

National Peoples Court: शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे नाशिकमध्ये आयोजन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशानुसार शनिवारी (ता.९) राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे.

एकूण ६३ हजाराहून अधिक प्रकरणे यावेळी ठेवली जाणार आहेत. शासकीय कार्यालय, वित्तीय संस्था, बॅंका, महावितरण, विमा कंपन्या, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार यांच्यासमवेत बैठकांचे आयोजन केले होते. (National Peoples Court will be held in Nashik on Saturday)

यामध्ये वसुलीची प्रकरणे, फौजदारी तडजोड पात्र, विद्युत चोरी तडजोडपात्र, भूसंपादन, अपघात विमा, वैवाहिक, धनादेश न वटणे, कर वसुली असे एकूण २३ हजार १९८ प्रकरणे प्रलंबित आहेत.

तसेच ग्रामपंचायत, महावितरण, वित्तीय संस्था, बिल वसुली आदी ६३ हजार २५४ दावे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्याच्‍या उद्देशाने जिल्हा न्यायालय, तसेच नाशिकरोड, जिल्‍ह्‍यातील सर्व तालुका न्यायालये, औद्योगिक-कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार, मोटार वाहन न्यायालय या ठिकाणी पॅनल नेमले आहेत.

पक्षकारांनी सहभागी होऊन तडजोडीने प्रकरणे मिटविण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. डी. जगमलानी, प्राधिकरणाचे सचिव एस. डी. इंदलकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT