मनमाड (जि. नाशिक) : बंगळूर येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या वीणा आहेर, पूजा वैष्णव, वैष्णवी इप्पर, पूजा परदेशी, वैष्णवी उगले, संध्या सरोदे, करिष्मा शाह यांची विविध वजनी गटात निवड करण्यात आली आहे.
सर्व वजनी गटातील विजयी खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २४ ते २८ मार्च दरम्यान क्रांतिवीरा स्टेडियम बंगळूर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (National ranking Weightlifting Competition Selection of 7 athletes from Manmad nashik news)
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एन. थोरात, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.