Cycling Championship esakal
नाशिक

National Road Cycling Championship : समृद्धी महामार्गावर राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोशिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने २७व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ७ ते ११ जानेवारी दरम्यान सिन्नर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पाथरे ते सोनारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. (National Road Cycling Championship will be organized on Samriddhi Highway from tomorrow nashik news)

या स्पर्धेत देशातील ३१ राज्य आणि क्रीडा मंडळाचे संघ सहभागी होत असून या स्पर्धेमधून राष्ट्रीय अकॅडमीसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी दि. 7 सायकालिंग फेडरेशन ऑफ आशियाचे सेक्रेटरी जनरल ओंकार सिंग यांच्या हस्ते होणार आहे.

२७व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपविण्यात आली आहे. विविध वयोगटात ट्रॅक,एमटीबी तसेच रोडवर विविध अंतराच्या स्पर्धांचे आयोजन करणे, या प्रकारात राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करणे.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी महाराष्ट्राचा संघ निवडणे, या संघाला प्रशिक्षण देणे, खेळाडूंना विविध सवलती पुरवणे, निरनिराळ्या राज्य-राष्ट्रीय पुरस्कारासाठी खेळाडूंची शिफारस करणे, सायकलपटूंच्या रोजगारासाठी विविध स्तरावर पाठपूरावा करणे इत्यादी कार्य संस्था नेहमीच करत आली आहे.

त्यामुळे यावेळीही स्पर्धेच्या आयोजणीची जबाबदारी महाराष्ट्राने यशवीरीत्या उचलली आहे असे सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. विक्रम रोटे, सचिव प्रताप जाधव यांनी सांगितले. सायकलिंग खेळामधील देशपातळीवरील सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) या सर्वोच्च फेडरेशनची मान्यता असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

समृद्धी महामार्गावर स्पर्धेसाठी विशेष परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. पाथरे ते सोनारी दरम्यान पॅकेज बारा अंतर्गत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी समृद्धीचा सुसज्ज ट्रॅक उपलब्ध झाला असून विविध अंतराच्या महिला व पुरुषांसाठीच्या स्पर्धा ट्रॅकवर खेळवण्यात येणार आहेत.

पाथरे येथे स्पर्धेचा स्टार्ट पॉइंट असून त्या ठिकाणी खेळाडूंच्या विश्रांती व भोजनाचे व्यवस्था करण्यात आली आहे पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक व वारेगाव ग्रामपंचायत कडून या स्पर्धेसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे पथक देखील रुग्णवाहिकेसह स्पर्धा स्थळी तैनात करण्यात आले आहे.

व्यावसायिक खेळाडू सहभागी होणार....

समृद्धी महामार्गावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत विविध राज्यातील व्यावसायिक खेळाडू सहभागी होणार आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे खेळाडू शिर्डी येथे दाखल झाले आहेत. तेथून दररोज समृद्धी महामार्गावर येत त्यांचा नित्य सराव सुरू आहे.

ताशी 35 ते 45 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या विशेष बनावटीच्या सायकल्स या स्पर्धकांकडे असून सर्वादरम्यान ते समृद्धी लगतच्या गावातील जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. यातील काही सायकलींची किंमत पंचवीस लाखांच्या घरात असून केवळ टायर 70 ते 80 हजारांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

K. C. Venugopal : पराभव केवळ काँग्रेसचा नसून महाविकास आघाडीचा...के. सी. वेणुगोपाल : काय झाले ते समजत नाही, पराभवावर विचारमंथन करणार

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT