National Voter's Day 2023 Garuda App esakal
नाशिक

National Voter's Day 2023: गरुडा App बनले यंत्रणेसाठी तारणहार! ऑनलाइन प्रणालीत रंगीत मतदारकार्ड

डिजिटल तंत्रज्ञानामुळे निवडणूक यंत्रणा बनली सक्षम

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक शाखेचा कारभार सुरळीतपणे व ऑनलाईनने होण्यासाठी गरुडा अँप बनवले असून त्याच्या माध्यमातून सध्या नाव नोंदणी ( फॉर्म नं ६), नाव वगळणे (फॉर्म नं ७), दुरुस्ती करणे ( फॉर्म नं ८), नवीन कार्ड काढणे (फॉर्म नं ६) व मतदार यादीतील नाव आधारकार्डाशी जोडणे ( फॉर्म नं ६ ब) इत्यादी कामे केली जातात.

इतर कामांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी अधिकारी (BLO) यांची नेमणूक करून यंत्रणा सक्षम केली आहे. म्हणून सध्या गरुडा अँप यंत्रणेसाठी तारणहार ठरले आहे. (National Voters Day Garuda App became savior for system Color Voter Card in online system nashik news)

सरकारी काम अन, सहा महिने थांब अशी एक प्रचलित म्हण आहे. नागरिकांना आपली कामे पूर्ण करण्यासाठी सरकार दरबारी खूप फेऱ्या माराव्या लागतात. रेशन कार्ड असो की, मतदान कार्ड काढायचे असले तरी चकरा थांबत नव्हत्या.

आता या फेऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांची निवडणूक आयोगाच्या नवीन धोरणात्मक बदल, विस्तारलेल्या कार्यप्रणालीमुळे व स्मार्ट, डिजिटल जमान्यातील संशोधनासह नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे सुटका झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता अगदी तुमच्या हातातील डिजिटल व स्मार्ट फोनवरही मतदारकार्ड तथा ओळखपत्र मिळू लागले आहे. ते ही चक्क रंगीत ओळखपत्र.

राज्याच्या विविध भागात मतदान ओळखपत्राबाबत कायम होणाऱ्या तक्रारींची दखल घेत हे पाउल उचलण्यात आले असून आता ऑनलाईन पद्धतीने रंगीत मतदान ओळखपत्र मिळवता येत आहे.

मतदार कार्डसाठी नोंदणी

रंगीत मतदान ओळखपत्राच्या नोंदणीसाठी स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. ज्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधता येईल. http://www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करुन आपापली व आवश्यक माहिती भरणे क्रमप्राप्त असते.

रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःची संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरताना ती व्यवस्थित भरणे आवश्यक असून त्यानंतर शेवटी तुमचा एक रंगीत फोटो अपलोड करावा लागतो. दरम्यान सर्व माहिती भरल्यानंतरच ती सेव्ह करावी.

नवीन किंवा ऑनलाईन मतदार ओळख पत्रासाठी पासपोर्ट, दहावीचे मार्कशीट, जन्म दाखला, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, आधार कार्ड, बँक पासबुक, फोन, पाणी, वीजबिल, इन्कम टॅक्स - फॉर्म नंबर १६ यापैकी कोणतेही २ कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

याबाबत संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर महिन्याभरात तुमचे रंगीत मतदान ओळखपत्र दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने रवाना जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT