Nauvari saree pride of Maharashtra esakal
नाशिक

Diwali Nauvari Saree : नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान!

सकाळ वृत्तसेवा

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्‍तसेवा

नाशिक : पारंपरिक ओचा कासोटा नऊवारी साडीतला. नऊवारी साडी हा हल्‍ली हौसेचा ‘ट्रेंड' तरुणाईत रुजलायं. पण पारंपरिक पोशाख म्‍हटला म्‍हणजे ‘नऊवारी साडी’. पूर्वजांनी विचारपूर्वक साडी नेसायची पद्धत तयार केली. पूर्ण अंगभर असणारी नऊवारी साडी आणि तिला साजेसा ब्‍लाऊज, यामुळे स्‍त्रीचे सौंदर्य अजून खुलते. तसेच शास्‍त्रोक्‍त पद्धतीने नेसलेल्‍या नऊवारी साडीतले वावरणे अगदी सहज व सोपे होते. महिलांच्‍या आरोग्‍यावरही सकारात्‍मक परिणाम होतो. (Nauvari saree is pride of Maharashtra Nashik Latest Marathi News)

दीपोत्सव मांगल्याचा आणि सौंदर्याशी आरोग्याचा मेळ घालणारा आहे. कूळधर्म, श्राद्ध, पुण्यतिथी आदी कार्यक्रमात नैवेद्य अथवा स्‍वयंपाक करताना नऊवारीत करण्याची प्रथा आहे. नऊवारी साडीत घोडेस्वारी करतात अन् हल्‍ली महिला बुलेट, ॲक्टिवा अशा दुचाकी सहजरित्‍या चालवू शकतात.

लग्नात अथवा मुंजीत, ज्येष्ठ नागरिकांच्या (साठी, सत्तरी अथवा ऐंशीव्या) वाढदिवस समारंभाला तरुणाई नऊवारीत आणि पुरुष धोतर अथवा सोवळे अशा पोशाखात असतात. हा पेहराव ‘रेडिमेड' म्‍हणजे शिवलेल्‍या स्‍वरूपात असतो. पारंपरिक पोशाख ‘फॅशन' होत चालला आहे. परंतु नऊवारी साडी, सोवळे, धोतर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने नेसल्‍यास त्‍यातील सहजता अनुभवता येईल. तरुणाईला त्‍यात रुची निर्माण होईल, हे नक्की.

शास्‍त्रोक्‍त पद्धतीने नेसलेली नऊवारी

शास्‍त्रोक्‍त पद्धतीने नेसलेल्‍या नऊवारीत महिलांना वावरणे सोपे व सहज होते. तसेच एकदा की या पद्धतीने साडी नेसायला शिकले, की साडीच्‍या प्रेमात पडल्‍याशिवाय राहात नाही. पंजाबी ड्रेसच्या लेगीनप्रमाणे नेसलेली साडी पूर्ण अंगभर अशी असल्‍याने सौंदर्य अजून खुलून दिसते. तसेच नऊवारी साडीवरचे साजेशे ब्‍लाऊज हे लहान गळ्याचे आणि उंचीला अधिक असतात. त्यामुळे नऊवारी साडीत पूर्वी स्त्रिया घोडेस्वारी अगदी सहजगत्‍या करत असत. त्यासाठी झाशीच्या राणीची प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे पटकन उभी राहाते.

स्त्रियांनी नेसलेली साडी जरूर शिकावी. तिचे शास्त्रीय फायदे आहेत. ब्रह्मनाडीच्या दृष्‍टीने असलेल्‍या महत्त्वात नऊवारीचा मागचा काष्‍टा खोचल्‍यामुळे काष्‍टाच्या हलकासा दाब ब्रह्मनाडीवर पडतो. महिलांचा उत्‍साह हा कायम राखण्यास मदत होते. त्‍यामुळे काम करताना लवकर मरगळ अथवा थकवा जाणवत नाही.

तसेच कंबरदुखीपासून दिलासा मिळतो. त्याचप्रमाणे पुरुषांनी सोवळे, उपरणे, सदरा-धोतर घालताना अथवा नेसताना ते शास्त्रीय पद्धतीने घातल्यास त्यातील सहजता अनुभवता येते. मागे खोचलेल्या काष्ट्याच्या हलकासा दाब ब्रह्मनाडीवर पडून उत्साह कायम राखण्यास मदत होते.

"आपल्‍या पारंपरिक पोशाख व तसेच परंपरागत नऊवारीचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी शास्‍त्रोक्‍त पद्धतीने पोशाख शिकून घेणे महत्त्वाचे आहे. पुढच्या पिढीपर्यंत हा ठेवा हस्‍तांतरित करणे, हे आपले कर्तव्यच आहे." - वर्षा मुळे-गायधनी, नाशिक

‘सत्तिका‘ प्रक्रीत शब्दापासून साडी शब्द

जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक भारतीय संस्कृती. भारतीयांमध्ये वेशभूषा आणि अलंकारांची आवड असून, साडी हा महत्त्वाचा पेहराव होय. पाच हजार वर्षांपूर्वी साडीचा पेहरावामध्ये समावेश झाल्याचे मानले जाते. बदलती जीवनशैली, काळ आणि भागनिहाय साडी परिधान पद्धतीत बदल झाला. साडीसोबत विविध पेहराव आले, फॅशन बदलली, तरीही साडीचे महत्त्व टिकून आहे.

जागतिक बदलाच्या रेट्यात विविध जीव, वस्तू, वास्तू, संस्कृती नष्ट झाल्यात. मात्र काही गोष्टी टिकल्या आहेत आणि नव्या रुपामध्ये पुढे आल्यात. त्यात साडीचा समावेश होतो. ‘सत्तिका‘ या प्रक्रीत शब्दापासून साडी हा शब्द तयार झाल्याचे मानले जाते. काही जण ‘चीरा’ (अर्थात कापड) या संस्कृत शब्दापासून साडी शब्द तयार झाल्याचे मानतात.

दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला कार्यशाळा

दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला शास्त्रोक्त नऊवारी साडी नेसण्यासंबंधीची कार्यशाळा ‘सकाळ'तर्फे होईल. पारंपरिक ओचा कासोटा असणारी नऊवारी साडी नेसण्याची योग्य पद्धती कार्यशाळेत शिकविण्यात येईल. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना स्त्रियांनी स्वतःची नऊवारी साडी आणायची आहे. साडी नऊवार म्हणजे ९ मीटर व पुरेशा उंचीची असणे आवश्‍यक आहे.

शक्यतो ‘बॉर्डर' असलेली साडी आणल्यास साडी नेसण्यातील कसब अधिक सुलभतेने आत्मसात करता येईल. ‘सकाळ'च्या महिलांसाठीच्या ‘तनिष्का‘ व्यासपीठच्या भगिनींसह इतर भगिनींसाठी ही कार्यशाळा खुली असेल. अधिक माहितीसाठी पल्‍लवी कुलकर्णी-शुक्ल (७७७६०६४४००) व ‘तनिष्का‘चे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे (८८८८९४७९७९) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT