Saptashrungi Devi Wani gad esakal
नाशिक

Navratri Festival 2023 : नाशिकमध्ये उद्या आणि वणीत शनिवारी ‘नवदुर्गा : जागर स्त्री शक्तीचा' कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या विभागीय आयुक्तालयसह कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी या शक्तीपीठांच्या ठिकाणी आजपासून २३ ऑक्टोबरपर्यंत ‘नवदुर्गा : जागर स्त्री शक्तीचा' हा महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होईल. (Navadurga Jagar Stree Shakticha program in Nashik tomorrow and Saturday in Vani news)

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी चार ते सहा या वेळेत हा कार्यक्रम होईल. तसेच वणी येथील यश लॉन्सच्या मंगल कार्यालयात शनिवारी (ता.२१) सायंकाळी चार ते सहा या वेळेत कार्यक्रम होईल.

कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून कार्यक्रम मुख्यमंत्री कार्यालयाचे आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य सरकारच्या महिलांविषयक योजनांची माहिती दिली जाईल.

कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे अन्न, नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, डॉ. सत्यजित तांबे, दिलीप बनकर, ॲड. माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, दिलीप बोरसे, ॲड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज अहिरे, नितीन पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल हे निमंत्रित आहेत. कार्यक्रम विनामूल्य आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT