Rameshgiri Maharaj during the Ghat installation in Jagdambamate Temple area on Sunday. Neighbor officials & Foot procession from Yevala esakal
नाशिक

Navratri 2023: जगदंबामातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविक लीन! हजारांवर भाविक बसले घटी

सकाळ वृत्तसेवा

Navratri 2023 : जगदंबामातेच्या भूतलावरील ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटमगाव येथील जगदंबामातेच्या चरणी रविवारी (ता. १५) पहिल्याच दिवशी हजारो भाविक लीन झाले.

पहाटेपासूनच येवला ते कोटमगाव रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलला होता. दरम्यान, सकाळी राष्ट्रसंत सद्‌गुरू जनार्दन महाराजांचे शिष्य कोपरगाव बेट येथील रमेशगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना झाली. (Navratri 2023 Thousands of devotees flock to feet of Jagadambamata on first day nashik)

नवसाला पावणाऱ्या श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वतीचे रूप असलेल्या जगदंबामाता यात्रेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

मंदिराच्या आवारातील ग्रामपंचायत, ट्रस्ट, मंदिर, सामाजिक सभागृहात सुमारे दोन हजार भाविक घटी बसले आहेत. रविवारी सकाळी मंदिरात रमेशगिरी महाराजांनी महाआरती केली. जगदंबा देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार झाला.

पौरोहित्य रवींद्र जोशी यांनी केले. मंत्रांच्या नामघोषात जगदंबामातेचा जागर करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त रामचंद्र लहरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने, सचिव दिलीप कोटमे, खजिनदार अंबादास भोसले, विश्वस्त अंबादास लहरे, गणेश कोटमे, डॉ. शंकर कोटमे, शुभदा दानी, शैला कलंत्री, सुमनबाई कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, ॲड. जुगलकिशोर कलंत्री यांच्यासह ग्रामस्थ व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मंदिर परिसर सुशोभीत केला असून, मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे, तसेच मूर्तीला दररोज विविध रंगातील पैठणी परिधान केल्या जाणार आहेत.

पादुकांची वाजगजत मिरवणूक

अनेक वर्षांची परंपरा जपत येथील जगदंबा सेवाभावी मंडळाने शहरातील पहाड गल्लीतून कोटमगाव येथील जगदंबामातेच्या पादुकांची वाजतगाजत मिरवणूक काढली. मिरवणुकीत डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन मातेचा जयजयकार करण्यात आला.

पादुका उजळविण्यासाठी जगदंबा सेवाभावी मंडळाला दिल्या होत्या. पादुका उजळून रविवारी घटस्थापनेच्या दिवशी मिरवणुकीने जगदंबा ट्रस्टकडे विधीवत सुपूर्द केल्या. ४० वर्षांचा रीतिरिवाज आजही घडत आहे.

यात्रोत्सवाने परिसर फुलला

कोटमगावची यात्रा विविध दुकानांनी सजली असून, रहाटपाळणे, सौंदर्य प्रसाधने, छोटे खेळ, मिठाई, हॉटेल्स आदी दुकाने थाटली आहेत. नवसपूर्ती करणाऱ्यांची संख्याही अधिक असते. घटी बसण्यासह साडी-चोळी, पैठणी परिधान करून, दान करून नवसपूर्ती केली जाते.

रोख स्वरूपातही अनेक जण दान करतात. याशिवाय देवीपुढे उलटे टांगून घेत नवसपूर्ती करण्याचीही परंपरा होती. मात्र, ही परंपरा काही वर्षांपासून बंद केली आहे. असे असले तरी नवसाला पावणारी माता अशी श्रद्धा असल्याने अनेक भाविक विविध मार्गाने नवसपूर्ती करतात.

वर्षानुवर्षे येथे घटी बसणाऱ्यांची संख्याही मोठी असून, सलग पंधरा-वीस वर्षे घरी बसणारे अनेक भाविक यंदाही पुन्हा घटी बसल्याचे सांगण्यात आले. मंदिर परिसरात रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेस. सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते आरतीचे नियोजन ट्रस्टने केले आहे.

"जगदंबामातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येणार असून, ट्रस्ट व ग्रामपंचायतने पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, दर्शन, दुकानांची मांडणी, सुरक्षा व्यवस्था आदींचे चोख नियोजन केले आहे. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी सुविधा दिल्या असून, रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्राव्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे व विश्वस्तांचे सहकार्य मिळत आहे."

-रावसाहेब कोटमे, अध्यक्ष, जगदंबा देवस्थान ट्रस्ट, कोटमगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT