Lovely idol of Ashapuri Mata at Narkol. esakal
नाशिक

Navratri Festival 2023: मनातील अशा पूर्ण करणारी नरकोळची आशापुरी!

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival 2023 : तब्बल सातशे वर्षांचा इतिहास असलेले करंजाळी खोऱ्यातील बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगर वनराईत निसर्गरम्य ठिकाणी वसलेली नरकोळ (ता. बागलाण) येथील आशापुरीमाता आता भाविकांचे श्रद्धास्थान झाले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने भाविकांची भक्ती वाढलेली आहे. (Navratri Festival 2023 Heart fulfilling narkol Ashapuri mata temple nashik)

इसवी सन १३०७ पासून आशापुरीचे दगडाचे बांधकाम केलेले छोटीसे मंदिर मातीत गेल्याने सर्वांचे दुर्लक्ष झाले होते.

परंतु पिंगळवाडे येथील भालचंद्र कोठावदे यांना मातेने दृष्टांत दाखवला, की नरकोळ गावाजवळील नदीकिनारी माझे मंदिर असून, ते मातीत गेल्यामुळे मला वरती काढा, या दृष्टांताचा कोठावदे यांनी नरकोळ, जाखोड, बंधारपाडा पिंगळवाडे या गावातील ग्रामस्थांना कल्पना दिली.

त्यानुसार या ठिकाणी जमीनमालक काशीनाथ शिंदे, हेमंत शिंदे यांनी स्वतःच्या मालकीची जागा मंदिरासाठी दान केल्यामुळे २००९ ला या ठिकाणी भव्यदिव्य मंदिर उभे राहिले. मंदिराचे बांधकाम सुरू असताना एका शिलालेखात १३०७ असा उल्लेख असलेली शिला सापडली.

यावरून हे मंदिर पुरातन असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. मंदिर रानात असल्याने देवीच्या मूर्तीचा गाभारा हा काचेच्या फ्रेममध्ये तयार केलेला आहे.

ही मनमोहक मूर्ती लाकडाच्या सिंहासनावर असून, मंदिरालगत शिवमंदिर, भैरवनाथ मारुती मंदिर असून, मंदिरासमोर दीपस्तंभ व दीडशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष आहे. मंदिरालगत करंजाळी नदीकिनारी कोल्हापूर टाइप बंधारा असल्याने भाविकांना पाण्याची सोय झालेली आहे.

दर वर्षी १० फेब्रुवारी हा दिवस मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिराचे विश्वस्त भालचंद्र कोठावदे यांच्या परिश्रमातून मंदिराची रोज देखभाल होते.

तर नरकोळचे वयोवृद्ध गुलाब पवार सकाळ व सायंकाळ नित्यनेमाने पूजाविधी, आरती करतात. भाविक येथे दर्शनासाठी दर वर्षी चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रात व शुक्रवार, मंगळवार नवसपूर्तीसाठी येतात.

देवीचे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे कसमादे पट्ट्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांचे सहलीचे आयोजन होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT