Ghatan Devi igatpuri nashik  
नाशिक

Ghatandevi Temple : संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी शैलपुत्री घाटनदेवी...

सकाळ वृत्तसेवा

विविध पंथीय साधू-संतांच्या पदस्पर्शाने इगतपुरी तालुका पावन झाला आहे. त्याचबरोबर प्रातःस्मरणीय घाटनदेवीच्या सान्निध्यामुळे तर त्या पावित्र्यात अधिक भर पडली. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकमार्गे मुंबईकडे जाताना अत्यंत नागमोडी वळणाचा कसारा घाट आहे. इगतपुरी परिसरात प्रवेश करतानाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासून प्राचीन असे देवीचे मंदिर आहे. घाटात देवीचे स्थान असल्याने घाटनदेवी असे म्हणून ते प्रसिद्ध झाले आहे.

घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट आहे. संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून घाटनदेवीचा महिमा आहे. (navratri special article on ghatandevi igatpuri nashik)

घाटनदेवी मातेची श्रीदुर्गा सप्तशतीत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कृष्णांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागिरी, महासिद्धी, महागौरी व रिद्धी-सिद्धी असे विविध रूपे आहेत.

यातील पहिले रूप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता होय. प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली, त्या वेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली, तीच ही घाटनदेवी. शैलाधिराज तनया म्हणून या देवीची मोठी ओळख आहे.

वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे प्रयाण करीत असताना देवी येथे विश्रांतीसाठी थांबली, अशी प्राचीन माहिती असली, तरी आजही तीच खरी आहे, असे येथे आल्यावर वाटते. नैसर्गिक वातावरण आणि सुंदर परिसराने मोहित होऊन देवीने येथे मुक्काम ठोकला, अशी पुरातन कथा आहे. या मंदिरासमोरच उटदरी नावाचे सृष्टीसौंदर्याने नटलेले ऐतिहासिक स्थान आहे. कल्याणचा खजिना लुटून उंट याच दरीत लोटले होते.

यामुळे या दरीला उंटदरी असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश उटदरी असा झाल्याचे इतिहासात नमूद आहे. कोणताही सहृदयी माणूस या ठिकाणी आल्याबरोबर अगोदर सृष्टीसौंदर्याकडे लक्ष देतो. विशेषत: मुंबई आणि नाशिककडे ये-जा करणारे वाहनातील प्रवासी तर इतके भारावतात, की त्यांना सौंदर्यक्षण टिपून घेण्याचा मोहच आवरता येत नाही.

वैदिक काळापासून देवीची येथे स्थापना झाल्याचे नमूद आहे. घाटनदेवीचा पूर्वी जुन्या ठिकाणी तांदळा होता, तो जसा होता तसाच आजही कायम आहे. पूर्वापार असलेले जीर्णमंदिर पडून गेल्याने गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भाविकांनी विचार करून लगेच नव्या मंदिराच्या कामास सुरवात केली. दोन ते तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

२१ एप्रिल १९८० ला देवी मूर्तीची प्रतिष्ठापना ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजलाल रावत यांच्या हस्ते करण्यात आली. हे देवस्थान १९९६ मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत करण्यात आले आहे. विश्वस्त म्हणून नऊ जणांची टीम कार्यरत आहे. नवरात्रोत्सवात या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरते. म्हणूनच राज्याच्या विविध भागांतून भाविक दाखल होतात. येथे भाविकांची पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत दर्शनासाठी गर्दी होत असते.

नवसाला पावणारी घाटनदेवी म्हणून देवीची ख्याती आहे. आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे प्रत्येक भाविक पितळी घंटा देवीचरणी वाहतो; तर बरेच भाविक येथे जाऊळ, सत्यनारायण पूजन, दुर्गासप्तशती पठण, पारायणे करून नवसाची पूर्ती करीत असतात. प्रत्येक निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ येथेच वाढविण्यात येत असतो.

त्यामुळे घाटनदेवी माता तालुक्याचे ग्रामदैवत बनले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे अहमदनगर, राजूर, अकोले, जव्हार, मोखाडा, ठाणे, कल्याण, मुंबई, जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, मालेगाव आदी भागांतील भाविकांची उपस्थिती लक्षवेधी असते.

(शब्दांकन : विजय पगारे, इगतपुरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT