Navratrotsav 2023 : सण- उत्सवामध्ये पारंपारिक कपडे भाड्याने घेण्याचा अनेक वर्षाचा ट्रेड आहे. आजच्या युगातही तो टिकून आहे. उलट काही अंशी त्यात वाढ झाली आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त चनिया चोली, धोती- कुर्ता पारंपारिक कपड्यांना भाडेतत्त्वावर घेण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता ते स्पष्ट होत आहे. (Navratrotsav 2023 trend of renting traditional clothes continues Dandiya Garba classes start nashik)
नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा विशेष आकर्षण असते. त्यासाठी पारंपारिक कपड्यांना अधिक पसंती दिली जाते. विशेष करून तरुण-तरुणी पारंपारिक कपडे परिधान करून गरबा रास दांडिया कार्यक्रमास हजेरी लावतात.
नऊ दिवस नऊ पद्धतीचे पोशाख खरेदी करणे प्रत्येकास शक्य नसते. यास पर्याय म्हणून अनेक जण भाड्याने पारंपरिक कपडे घेऊन दांडिया खेळण्याचा आनंद लुटतात. ८० टक्के महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा यात सहभाग असतो.
दोन ते अडीच वर्षाच्या तुलनेत यंदा भाड्याने कपडे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्तापासूनच मागणी सुरू झाली आहे. सध्या १५ टक्के मागणी वाढली आहे.
उत्सवाच्या चार ते पाच दिवस अगोदर आणखी तीस ते पस्तीस टक्के मागणी वाढून संपूर्ण उत्सवात चाळीस ते पन्नास टक्के मागणी वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
चनिया चोली, केडिया, धोती सूट, इंडो वेस्टर्न अशा विविध प्रकारचे पारंपारिक पोशाखाना मागणी आहे. सध्या दांडिया गरबाचे क्लासेस सुरू असल्याने १५ टक्के मागणी झाली आहे.
"गेल्या ३० वर्षापासून पारंपारिक कपडे भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहे. कपडे परिधान केल्यानंतर तरुण-तरुणींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद समाधान देतो. रोज काही नवीन या युक्तीतून व्यवसाय अद्याप टिकून आहे."- तुषार परमार, व्यावसायिक
पोशाख भाडे
चनिया चोली २०० ते ३००
धोती सूट २०० ते ३००
केडिया सूट २०० ते ३००
इंडो वेस्टर्न २०० ते २५०
लहान मुलांचे पोशाख १५० ते २००
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.