NCP land mafia connection esakal
नाशिक

Nashik : भूमाफियांना पाठीशी घालणारा राष्ट्रवादीचा ‘तो’ नेता कोण?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इनामी जमिनीवर डल्ला मारून करोडोंची माया कमविणाऱ्या व गोरगरिबांना फसवणाऱ्या जेल रोड भागातील भूमाफियांना (Land Mafia) संरक्षण देण्यासाठी राजकारणातील (Politicians) मंडळी पुढे आली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील फाइल टेबलावर न आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बड्या नेत्यांचे वजन वापरून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा नारायणबापूनगर परिसरात आहे. (NCP leader backing land mafia seizing lands of people Nashik News)

दसक शिवारातील टाकळी मलनिस्सारण केंद्रासमोर श्री तिरुपती बालाजीचे नावाने भव्य- दिव्य नगरी उभी राहत असली तरी यातील बहुतेक नगरी अनधिकृत असल्याची बाब समोर येत आहे. सर्व्हे क्रमांक ७८ व ७९ मध्ये इनामी जमिनींवर ही नगरी उभी राहत आहे. या जमिनी शासनाने इनामी म्हणून दिल्या आहेत. या जमिनींचे व्यवहार शासनाच्या परवानगी शिवाय करता येत नाही. नजराणा भरण्याच्या अटीवर व्यवहाराची परवानगी दिली जाते. नजराणा बाजारभावाच्या जवळपास असतो. त्यामुळे नजराणा चुकविण्यासाठी नोटरीवर व्यवहार करण्यात आले. खरेदी झाली असती, तर स्टॅम्प ड्यूटी भरावी लागली असती. हादेखील एक लाभ येथील भूमाफियांनी पदरात पाडून घेतला. माजी नगरसेवक दिनकर आढाव, पवन पवार, तसेच विलासराज गायकवाड, दीपक सदाकळे यांची थेट नावे घेतली जात आहे.

दरम्यान, प्रकरणाची दडवादडवी सुरू झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिकेत राजकीय वजन वापरून कारवाईच्या फाइल दबल्या जात आहेत. इनामी जमिनीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे, तर इनामी जमिनींवर बंगले उभारले जात असताना त्या अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या दोन्ही शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दबावतंत्र

जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाच्या कारवाईची फाइल पडून असतानादेखील अद्यापही कारवाई होत नाही. कारवाईची फाइल दाबण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव कारणीभूत असल्याची चर्चा प्रभाग क्रमांक २२ व २४ मध्ये सुरू आहे.

तर निवडणुकीत त्रिकुट

या प्रकरणात चर्चेत असलेले माजी नगरसेवक सध्या भाजपचे असले तरी यापूर्वी ते दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. तर त्यापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पॅनल तयार करण्याच्या अटीवर राष्ट्रवादी खुले आम बचाव करण्यासाठी उतरल्याचे बोलले जात आहे. यानिमित्ताने मात्र सुंठी वाचून खोकला जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT