Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ३१) राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली.
तसेच अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन देत श्री. भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. (NCP Samata Parishad demand arrest of Sambhaji Bhide nashik)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबाबत निंदा-नालस्ती करणारे विधान करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्याचा त्यांनी यापूर्वीही प्रयत्न केला आहे. भिडे हे प्रत्येकवेळी महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून तरुणांची माथे फिरून दिशाभूल करत आहेत. भिडे जातिवाचक वक्तव्य करत असल्याने दोन समाजांत जातीय तेढ निर्माण होऊन दंगली घडू शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,
नाना महाले, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, समता परिषदेच्या शहराध्यक्षा कविता कर्डक, आशा भंदुरे, पूजा आहेर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, गौरव गोवर्धने, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरनार, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.