Sriram Shete, former first district president of NCP, speaking at a meeting held on Tuesday evening in support of NCP president Sharad Pawar on the lawn of a nice hotel. esakal
नाशिक

Sharad Pawar Group Member : श्रीराम शेटेंसह नेत्यांचे शरद पवारांना समर्थन!

NCP Political Crisis : माजी आमदार भालेरावांसह जिल्हाध्यक्ष अन माजी नगरसेवकांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar Latest News : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या एकत्र येण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे समर्थन कोण करणार याबद्दलची उत्सुकता जिल्हावासियांमध्ये होती.

अशातच, आज राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरचे पहिले जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी श्री. शरद पवार यांच्या समर्थनार्थ उतरण्याचा निर्णय घेतला. (NCP Sharad Pawar Leaders support Sharad Pawar including Shri Ram Shete nashik political)

राष्ट्रवादी भवनासमोरील तासभराच्या राड्यानंतर जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी नगरसेवक गजानन शेलार, सुरेश दलोड यांनी समर्थकांची बैठक छान हॉटेलच्या हिरवळीवर घेतली.

त्याठिकाणी श्री. शेटे यांच्यासह चांदवडचे माजी आमदार उत्तम भालेराव, लक्ष्मण मंडाले, रतन चावला आदी उपस्थित होते. श्री. शेटे म्हणाले, की शरद पवार यांनी कष्टकरी, कामगार, शेतकरी, गरीब, महिलांसाठी मोठे काम उभे केले आहे.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत हे स्पष्ट केले. त्यामुळे श्री. शरद पवार यांना ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे कार्यालय असल्याने आम्ही बैठकीसाठी गेलो होतो. हे कार्यालय आमचे आहे, मात्र त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी नव्हे, तर पोलिसांनी प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे ती बैठक इथे होत आहे, असे श्री. शेलार यांनी सांगितले.

श्री. आव्हाड म्हणाले, की राज्यात जे झाले ते जनतेला मान्य नाही. आपल्या नेत्यांनी लोक ‘खोके' म्हणून चिडवतील, तर त्याचे वाईट आपणाला वाटेल. मुळातच, देशात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लाट तयार झाली असताना आमचे नेते त्यांच्यासोबत का गेले हे कळत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घाई केली. आम्ही बुधवारच्या (ता. ५) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीसाठी जाऊन श्री. शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

आम्हाला भांडण नकोय...

आमचे नेते खोकेवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. मात्र आम्हाला भांडण करायचे नाही. पक्षाचे कार्यालय कुणाच्याही मालकीचे नाही. त्यामुळे या कार्यालयाचा ताबा एकदिवस घेतला जाईल. जनताही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे श्री. दलोड यांनी सांगितले. श्री. मंडाले, श्री. चावला यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.

‘होय मी शरद पवार समर्थक'

श्री. शरद पवार यांचे भले मोठे छायाचित्र असलेला ‘होय मी शरद पवार समर्थक' असे पोष्टर ॲड. सुरेश आव्हाड यांनी आपल्या गळ्यात घातले होते. त्यांनी छान हॉटेलच्या हिरवळीवर झालेल्या बैठकीत आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT