NCP Jayant Patil esakal
नाशिक

Jayant Patil: पक्षावर निष्ठा नसलेल्यांवर राष्ट्रवादीने प्रेम करणे आता थांबावा; नाशिककरांची जयंत पाटलांना साद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभेच्या मागील विधानसभा निवडणुकीवेळी नाशिक पूर्व मतदारसंघातून आयत्या वेळचा उमेदवार देण्यात आला. तसेच आगामी निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा आणि आपले मतदारसंघ काँग्रेस अथवा शिवसेनेला सोडण्यात येवू नयेत.

त्याचबरोबर विश्‍वासार्ह्यता अन पक्षावर निष्ठा नसलेल्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेम करणे थांबवावे. ही साद आज येथे नाशिककरांतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घालण्यात आली. (NCP should stop loving not loyal to party Nashik people request to Jayant Patel nashik news)

निमित्त होते, राष्ट्रवादी भवनात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीचे. गजानन शेलार यांनी मध्य मतदारसंघ पक्षाला मिळावा आम्ही पक्षाला आमदार देऊ असा विश्‍वास व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर आमच्यातील एक जण राष्ट्रवादीत, दुसरा काँग्रेसमध्ये, तिसरा शिवसेनेत, चौथा भाजपमध्ये अशी स्थिती नसून आम्ही राष्ट्रवादीमध्ये एकदिलाने आहोत, असेही त्यांनी सांगितले.

माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आहेर आदी उपस्थित होते.

पक्ष कार्यकर्त्यांची बैठक म्हटली, की प्रदेशाध्यक्षांकडून कानउघाडणी करणे हे सूत्र स्थानिकांना माहिती असल्याने प्रदेशाध्यक्ष आता काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष होते. मात्र स्थानिकांच्या आग्रहाच्या जोडीला काही संघटनात्मक बांधणीचे चित्र पुढे आल्याने प्रदेशाध्यक्षांकडून कानउघाडणी झाली नसल्याबद्दल बैठकीनंतर प्रमुख पदाधिकारी सुटकेचा निःश्‍वास सोडत होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

‘एक तास राष्ट्रवादीसाठी'

केंद्र व राज्य सरकारची एकाधिकारशाही, महागाई, बेरोजगारी, कांद्याला भाव न मिळणे असे गंभीर प्रश्‍न तयार झाले असल्याने भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे दिल्लीमधील भाषण यामुळे विरोधकांसाठी चांगली संधी मिळाली आहे, असे सांगून प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की कुठलाही विधानसभा मतदारसंघ मागत असताना सभासद नोंदणी आणि बूथ समित्यांची रचना महत्त्वाची असते.

त्यामुळे मध्य मतदारसंघातील २ हजार ९४० बुथवरील सदस्यांना मतदारांची विभागणी करून देत ‘पर्सनल टच' वाढवावा. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘एक तास राष्ट्रवादी काँग्रेस'साठी राबवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रत्येक बुथवर राबवावा. त्यावेळी स्थानिकपासून ते दिल्लीपर्यंतच्या प्रश्‍नांची चर्चा करत पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडावी.

धनंजय मुंडेंवर जबाबदारी

बूथ समित्यांच्या रचनांची जबाबदारी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मराठवाडा, नाशिक आणि नगरची देण्यात आली आहे. ते यासंबंधाने सविस्तर माहिती देतील. पण आगामी विधानसभा निवडणुका वर्षभरावर असल्याने भरपूर वेळ असल्याने घराघरांत सभासद नोंदणी करावी.

त्याचबरोबर आता ‘सायकॉलीजकल' लढाई असल्याने पक्षाचे सभासद वाढवावेत. राज्यभर महाविकास आघाडीचे मेळावे होणार आहेत. त्यातील एक मेळावा ३ जूनला नाशिकमध्ये होईल, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसभा जिंकण्यातून मदत

सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार की लोकसभा निवडणूक अगोदर आणि विधानसभा निवडणूक नंतर हे माहिती नाही, असे सांगितले. तसेच कसल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकण्यातून विधानसभेसाठी चांगले वातावरण तयार होईल, असेही ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT