RTO Road Safety Rules : गेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर स्लीपर कोच बसचा भीषण अपघात होऊन २६ जणांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडल्याने लक्झरी बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अपघातांच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रॅव्हल्स संचालकांनी ‘आरटीओ’चे नियम काटेकोरपणे पाळून आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी बाब प्रकर्षाने निदर्शनास आली आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (Necessary measures should be taken by following rules of RTO to stop accident nashik news)
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचेही अपघात होऊ नयेत, यासाठी वाहतूकदारांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, विशेषतः लांब टप्प्याच्या प्रवासी वाहनांमध्ये आपत्कालीन प्रसंगी जीवितहानी टाळण्यासाठी असणारी बचावात्मक उपकरणे व सुविधांबाबत वाहतूकदारांनी प्रवाशांमध्ये जनजागृती करणे ही बाबही आवश्यक आहे. बसचा अपघातविरहित प्रवास होण्यासाठी तसेच आपत्कालीन प्रसंगी जीवितहानी टाळण्यासाठी बस वाहतूकदारांनी पुढील बाबींची दक्षता घेतली तर अपघात होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
वाहनचालक व क्लीनर प्रशिक्षण हवे
बसच्या कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे, बसमध्ये अग्निशामक यंत्रणा हवी, काचा फोडण्यासाठीचे हॅमर पाहिजे, आपत्कालीन मार्ग असावा, स्लीपर कोच काचबंद बसमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी पुरेशी यंत्रणा आवश्यक, वाहनचालक व क्लीनरना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण आवश्यक.
नियम तर पाळावे लागणारच
अतिवेगात वाहन चालवू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग करू नये, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करू नये, वाहन चालविण्याचे नीट प्रशिक्षण घेतल्यावर परवाना प्राप्त झाल्यावरच वाहन चालविण्यास घेणे, चालकांवर अतिताण न होण्याची काळजी घेणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे, लेनची शिस्त नेहमी पाळणे, आखून दिलेली वेगमर्यादा पाळणे, महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनांना मदत करा, गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा, रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे आणि पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा, वाहतूक नियम पाळा.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वाहन चालविताना ही घ्या काळजी
वाहन चालविताना दुचाकी, चारचाकी, बस अथवा खासगी बसच्या वाहनचालकांनी डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळावे, एकावेळी एकपेक्षा अधिक वाहनांना ओव्हरटेक करू नये, ओव्हरटेक करताना तुमच्या उजवीकडील आरशात पाहणे आवश्यक, आपल्या पुढे ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनासोबत समांतर ओव्हरटेक करू नये, पुढील वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा, वेग नियंत्रणात ठेवा, अवजड वाहनांच्या मागे राहून गाडी चालवू नये,
महामार्गावर वाहन चालविताना वाहनाची तांत्रिक स्थिती दर्जेदार हवी, आपल्यावर वेगाची मर्यादा हवी, जी गाडी हाताळलेली नाही, त्याची नीट माहिती करून घ्या आणि मगच चालवा, गाडीच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती करून घ्या, उदाहरण- गाडीचा वेग वाढण्याची मर्यादा, गाडीची रस्ता धरून राहण्याची क्षमता, स्टिअरिंगची संवेदनक्षमता, ब्रेक्सची स्थिती आदी. महामार्गावर गाडी चालविताना गाण्यांचा आवाज कमी ठेवा, १०० टक्के एकाग्रता आणि वचनबद्धता राखूनच गाडी चालवा, झोप येत असेल तर स्टिअरिंग हातात घेऊ नका.
जबाबदारी तर सर्वांचीच
शासकीय, निमशासकीय बस अथवा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्लीपर कोच बस यांच्या अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात अनेक लोक जिवानिशी जात असतात; तर अनेक गंभीर जखमी होतात आणि आयुष्यभरासाठी दिव्यांगत्व येत असते.
यामुळे कुटुंब व्यवस्थाही मोडकळीस येते, सर्वच प्रकारच्या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अपघात रोखणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे. नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता ही भारतीय राज्यघटनेच्या ४७ व्या कलमात शासनास नेमून दिलेली जबाबदारी आहे.
"अनेक चालक मद्यपान करून, तर काही मोबाईलवर बोलताना वाहन चालवत असतात. यामुळेही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे असे चालक वाहन तपासणी करताना आढळल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील." - प्रदीप शिंदे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.