Babanrao Lonikar along with a delegation of farmers from Nepal while learning about Indian traditional method of non-toxic agriculture at the World Agriculture Festival organized by Sri Swami Samarth Seva Marga. esakal
नाशिक

World Agricultural Festival: नेपाळच्या शेतकऱ्यांनी घेतली विषमुक्त शेतीची माहिती; 4 लाख नागरिकांची भेट

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर (जि. नाशिक) : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे नाशिकमध्ये झालेल्या पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाला सहा राज्यांसह नेपाळमधील शेतकऱ्यांनी खास भेट देत भारतीय पारंपरिक पद्धतीची विषमुक्त शेतीची माहिती जाणून घेतली.

या महोत्सवास सुमारे चार लाख नागरिकांनी भेट दिली. महोत्सवात सुमारे १२ कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Nepalese farmers learn about toxic free agriculture Visit of 4 lakh citizens at swami samarth World Agricultural Festival nashik news)

श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, गुरुपीठ आणि श्रीस्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा महोत्सव झाला. त्यात शेतीसंबंधित मोठी आर्थिक उलाढाल झाली. विषमुक्त शेती, भरड धान्य आणि सेंद्रीय शेतीच्या प्रसारावर भर देण्यात आला. या महोत्सवाला सुमारे चार लाख नागरिकांनी भेट दिली.

नेपाळ येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महोत्सवाला हजेरी लावत सेंद्रीय शेतीचा प्रयोग आपल्या देशात करण्याचा संकल्प करीत चिनी तंत्रज्ञानावर नव्हे, तर भारतीय पारंपरिक पद्धतीची शेती आणि सेंद्रीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आपली भूमिका असल्याचे सांगत माहिती जाणून घेतली. महोत्सवात स्थानिक शेतकऱ्यांची संख्या अधिक होती.

१५० जणांना रोजगार

कृषी महोत्सवात 'शेतीजोड व्यवसाय' आणि स्वयंरोजगार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रासाठी सुमारे सात हजार कृषी पदवीधरांसह बेरोजगार तरुणांनी हजेरी लावली होती.

या तरुणांना अनेक अॅग्रिकल्चर कंपन्यांचे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ दाखल झाले होते. महोत्सवात मेळाव्यात शेतीसंलग्नित कंपन्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यातून दीडशे तरुणांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

५ हजार विवाह नोंदणी

विवाह संस्कार विभागातर्फे सुमारे पाच हजार विवाहेच्छूक मुला मुलींची नोंदणी झाली. त्याच ठिकाणी आठ विवाह झाले. नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तू आबासाहेब मोरे यांच्या हस्ते देण्यात आल्या.

मोहत्सवास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनामूल्य प्रवेश घेण्यासाठी ग्रीन पासचा यशस्वी वापर झाल्याने सर्वांनी या संकल्पनेचे स्वागत केले.

"गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने कृषी महोत्सवाची कीर्ती जागतिक पातळीवर पोहोचली आहे. नेपाळसह देशातील सहा राज्यांतील शेतकऱ्यांनी भेट दिली. पाच दिवसांच्या या महोत्सवात शेतकऱ्यांची मोठी उलाढाल झाली." -आबासाहेब मोरे, कृषी अभियान प्रमुख, सेवा मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT