येवला (जि. नाशिक) : २०२० मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय झाला खरा पण अजूनही या पेपरचे स्वरूप, अंमलबजावणीचा मुहूर्त ठरला नसल्याने शिक्षण क्षेत्रात संदिग्धता आहे. यातील बदलाची उत्सुकता, वेध अन् धाकधूक असून अंमलबजावणीसह दहावी-बारावीच्या निर्णयाविषयी संदिग्धता असल्याने शिक्षक-विद्यार्थ्यांत या बदलाकडे लक्ष लागले आहे.
येत्या जूनपासून याची अंमलबजावणी होणार का हा प्रश्न असून नुकतीच विभागीय समिती गठित करण्यात आल्याने आशावाद वाढला आहे. (new National Education Policy still uncertainty in education sector nature of paper timing of its implementation not determined nashik news)
केंद्र सरकारने डिसेंबर २०२० पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या टप्प्यावर कामकाज सुरू आहे. यामध्ये अभ्यासक्रमाचे ओझे कमी करून खेळ, कृती व शोध यावर अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.
परीक्षेतील गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकासावर भर देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना विषय निवडीचे देखील स्वातंत्र्य दिले जाणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेचे महत्त्व देखील यात कमी होणार आहे.
प्रशासकीय तयारी सुरू
केंद्र व राज्य पातळीवर जबाबदाऱ्यांचे विभाजन करत सार्थक ही पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, नवीन अभ्यासक्रम निर्मितीचे काम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे ही संस्था करणार असून शिक्षक प्रशिक्षणाची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच आहे तर सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणीची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाकडे आहे.
असा होणार रचनेत बदल!
नव्या धोरणानुसार पहिल्या पाच वर्षांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची तीन वर्ष तसेच इयत्ता पहिली व दुसरीचा समावेश असून यात खेळ, शोध, कृती आधारित शिक्षण दिले जाईल. विद्यार्थी तिसरीत प्रवेश होईपर्यंत वाचन व लेखनाच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची निर्मिती आनंददायीरित्या करण्यात येणार आहे.
तिसरी ते पाचवी या वर्गामध्ये कृती व खेळ आधारित परस्पर संवादी अभ्यासक्रम तर सहावी ते आठवी करिताकृती आधारित प्रायोगिक अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार आहे तर नववी ते बारावी या चार वर्षात ४० वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.
"नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यातील बदल ठळकपणे अधोरेखित होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्री शिक्षण पद्धती अमलात येणार असून सर्जनशीलतेला अधिक चालना मिळणार आहे."
- डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी,सदस्य, अभ्यास मंडळ बालभारती, पुणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.