New Year Celebration Esakal
नाशिक

New Year 2024: नववर्षाच्या स्वागताला नाशकात 50 हजार मद्यपान परवाने

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वैयक्तिक स्वरुपापासून ते पाटर्यांमध्ये केल्या जाणाऱ्या मद्यपानाचे परवाने दिले जाते.

सकाळ वृत्तसेवा

New Year 2023 : नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र या जय्यत तयारीवर ऐनवेळी येणारे विघ्न टाळण्यासाठी शहरातील सुमारे ५० हजार जणांनी मद्यपान परवाने घेतले असून यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. (New Year 2024 50 thousand people get liquor license nashik news)

तर, नववर्षाच्या पूर्वसंध्येला क्‍लब लायसन्स (पार्टी परवाने) यासाठी १२ अर्ज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आले आहेत. दुसरीकडे या पार्श्‍वभूमीवर परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून याकाळात नाकाबंदी करून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वैयक्तिक स्वरुपापासून ते पाटर्यांमध्ये केल्या जाणाऱ्या मद्यपानाचे परवाने दिले जाते. यामध्ये एकदिवसीय, वार्षिक व आजीवन अशा स्वरूपाचेही परवाने असतात.

नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपींकडून जल्लोष करीत पार्ट्यां केल्या जातात. मात्र मद्यपींकडे परवाना नसेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो. राज्य उत्पादन शुल्क वा पोलिसांकडून होणारी ही कारवाई टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपानाचे परवाने दिले जाते.

त्यानुसार, येत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर आत्तापर्यंत सुमारे ५० हजार जणांनी मद्यपान परवाने घेतले आहेत. तर, मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी क्‍लब पार्ट्याही आयोजित केल्या जातात.

अशा स्वरूपाच्या पार्ट्यांसाठीही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्याची गरज असल्याने आत्तापर्यंत १२ संयोजकांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. गतवर्षी २० संयोजकांना क्‍लब पार्टीसाठी परवाने दिले गेले होते.

मात्र क्‍लब पार्टीची मागणी करणाऱ्या प्रत्येक संयोजकाला परवानगी नाकारलीही जाते. त्यामुळे संयोजकांकडून आगाऊच परवान्यासाठी अर्ज केले जात आहेत. तसेच, परराज्यातून होणारी अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर, आंबोली, हरसुल, राजबारी (पेठ), बोरगाव (सुरगाणा) या ठिकाणी २४ तास नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून अवैध मद्याचे स्पॉटसह असे मद्य बनविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT