नाशिक : आधी लष्कर प्रमुख आणि त्यानंतर चीफ आर्मी स्टाफ असलेले लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी नाशिकला दोनदा दौरा केला आहे. तब्बल वीस वर्षाहून अधिक कुठल्याही अत्याधुनिक शस्त्रात दाखल न झालेल्या तोफखान्यात रावत यांच्या उपस्थितीत दोन के वज्र आणि २५ एमएम ७७७ अशा दोन तोफा दाखल झाल्या होत्या. या शिवाय कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या (कॅट) तळाला स्वतंत्र निशान रावत यांच्या कारकिर्दीतच बहाल झाले. तोफखाना केंद्रासह कॅटला भेट देणारे ते पहिले लष्करप्रमुख आणि चीफ आर्मी स्टाफ होते. बुधवारी दुपारी अपघाताचे व सायंकाळी मृत्यूचे वृत्त धडकताच नाशिकमधील लष्करी कॅम्प परिसरातील मोबाईल स्वीच ऑफ झाले होते.
गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनला निशान देऊन गौरविण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती राष्ट्रपती तथा सरसेनापती रामनाथ कोविंद यांच्या सोबत लष्कर प्रमुख रावत गांधीनगरला आले होते. १० ऑक्टोबर २०१९ ला गांधीनगरच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशनच्या मैदानावर झालेल्या दिमाखात हा सोहळा झाला होता. एक नोव्हेंबर १९८६ रोजी स्थापन झालेल्या कॉम्बट आर्मी एव्हीएशन (कॅट) ला ३३ व्या वर्षी हे निशाण प्राप्त झाले. त्यात लष्करप्रमुख बिपिन रावत आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी कोविंद यांचे स्वागत केले.
तत्पूर्वी नोव्हेंबर २०१८ ला नाशिक रोडला तोफखाना केंद्राच्या फायरिंग रेंजवर संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांच्यासोबत झालेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत हॉवित्झर ‘वज्र’ आणि अल्ट्रा लाइट हॉवित्झर या दोन तोफसह वाहन व तोफ वाहून नेणाऱ्या वाहन समारंभपुर्वक लष्करात दाखल झाल्या. त्यांची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. साधारण २० वर्षानंतर लष्करात एकाचवेळी दोन अत्याधुनिक तोफा लष्करात दाखल होण्याची वेळ आहे. अमेरिकेकडून घेतलेल्या २५ एम ७७७ होवित्झर तोफा आणि दक्षिण कोरियन कंपनी आणि एलॲण्डटी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या के-९ वज्र या तोफांचे लष्कराला हस्तांतरण झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.