नाशिक : महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील अकोले तालुक्यामधील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यमध्ये तमिळनाडूतील (Tamil Nadu) निलगिरी पर्वत रांगेत दिसणाऱ्या चौकोनी शेपटीच्या बुलबुलचे दर्शन झाले. (Nightingale at Kalsubai Harishchandragad in Nilgiri mountain range in Tamil Nadu nashik news)
हा पक्षी राज्यात कमी दिसतो. अभयारण्यातील पहिल्या बर्ड सर्वेक्षणात बुलबुल आढळला. इथं जैवविविधतेच्या समृद्धीचे संकेत त्यातून मिळाले आहेत. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड परिसरात सर्वेक्षण झाले. त्यावेळी बुलबुल हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी दिसून आला.
सर्वेक्षणात १२६ पक्ष्यांचा अधिवास इथे असल्याचे आढळले. पश्चिम घाट ही जगातील सर्वाधिक जैवविविधतेच्या आठ जागांपैकी एक आहे. कळसुबाईचे उंच शिखर याच रांगेत येत असल्याने परिसरात अनेक नवीन स्थलांतरित पक्षी सर्वेक्षणात दिसले. डोंगरांच्या कुशीत शिरलेली नागमोडी वळणे, हिरवीगर्द वनराई, सृष्टीसौंदर्यतेने हा परिसर संपन्न आहे. हिंदू संस्कृतीतील हरिश्चंद्र राजाची व शिवकालीन संस्कृतीची आठवण करून देणारा हा परिसर आहे.
पश्चिम घाटातील कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, अलंगगड, कुलंगगड, मलंगगड, आजोबाचा डोंगर ही उंच गिरी-शिखरे निसर्गप्रेमी व साहसी गिर्यारोहकांना आव्हान देतात. सह्याद्रीच्या गिरी-शिखरांनी वेढलेल्या प्रवरा व मुळा नदीचे उगमस्थान व निम्न सदाहरित वनांनी आच्छादलेला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला जंगलपट्टा म्हणजे कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यचे संरक्षण-संवर्धन चांगले व्हावे यासाठी राज्य सरकारने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम १८ नुसार २५ फेब्रुवारी १९८६ पासून हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
अभयारण्यात करप, हिरडा, बेहडा, आंबा, जांभुळ, उंबर, करांबु, फणस, काटेसावर, अर्जुन, गेळ, बहावा, मोह, आवळा, पंढरी, गुळचाई, कढीपत्ता, रगतरोहडा, कुडा, भुतकेस, लोद, पाइर, पिपर, शेंदरी, धामन आदी वृक्षसंपदा आहे. करवंद, तोरण, आंबळ, कुसर, कारवी या झुडुपवर्गीय वनस्पती मोठ्याप्रमाणात आहेत. जवळजवळ २०० वनस्पतींची सूची करण्यात आली आहे.
ट्रेकींगसोबत पक्ष्यांसाठी प्रसिद्ध
ट्रेकिंग सोबत आता हा परिसर स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध होणार आहे. चौकोनी शेपटीचा बुलबुल ही काळ्या बुलबुलची एक प्रजाती आहे. हा पक्षी जंगल अथवा घनदाट झाडीमध्ये राहणे पसंत करतो. त्याचा आकार २१ ते २४ सेंटीमीटर असून चौकोनी टोकदार शेपटीसोबत चकचकीत काळा डोके, हिरवट पिसारा, तपकिरी कान, पंख आणि शेपटी आणि गडद हनुवटी, घसा, छाती आणि खालचा भाग राखाडी असतो. पक्ष्याची चोच चमकदार लाल आणि नारिंगी असते. पाय पिवळसर-लाल व नखे काळे असतात.
"कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून इथल्या अनेक प्रजातीच्या पक्ष्यांची प्रथम नोंद झाली. पूर्वी परिसरात पक्ष्यांचा अभ्यास झालेला नव्हता. आता कोणते पक्षी, कोणत्या भागात आहेत याची माहिती आम्हाला समजली. सर्वेक्षण वर्षभर केले जाईल." - गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.