NIMS Hospital team with patients esakal
नाशिक

Nashik News: नशीब बलवत्तर, देवदुतांच्या मेहनतीने मृत्यूवर मात! तरुणाला वाचविण्यात डॉक्टर यशस्वी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : २५ मेस अभोणा (ता. कळवण) येथील शेतात किरण बागूल हा तरुण ३० फूट खोल विहिरीत मोटार दुरुस्तीचे काम करून चढून वर येत होता व पण अचानक त्याचा तोल गेला आणि तो सरळ डोक्याच्या बाजूने खाली सरळ गजावर पडला आणि क्षणात तो गज त्याच्या मानेच्या उजव्या बाजूने पाठीच्या वरच्या भागातून शरीरात घुसून उजव्या फुफ्फुसाला छेदत छातीच्या पिंजऱ्याला म्हणजे बरगड्याना मोडत पोटाच्या वरच्या भागातून बाहेर आला. (NIIMS doctor succeeded in saving young man Nashik News)

विहिरीतील दृश्य बघून सर्वांच्या अंगाचा थरकाप उडत होता. खाली एकच कामगार राहिला होता व समोर किरण विव्हळत पडलेला होता. या कामगाराने हिंमत करत किरणच्या शरीरात आरपार घुसलेला गज ताकदीनिशी उपटून काढला.

मात्र त्यानंतर त्याला भोवळ येऊन तो पण कोसळला. गावकऱ्यांनी तातडीने अभेण्यातील डॉ. धर्मेंद्र शिंदे यांच्याकडे आणले. त्यांनी प्रथमोपचार करत किरणला स्वतः कळवण येथील श्री छत्रपती हॉस्पिटलमध्ये नेले.

तेथे डॉ. भगवान टोंपे यांनी किरणची तपासणी एक्स- रे करून लगेच कृत्रिम श्र्वास दिला. पुढच्याच तासाला रुग्ण नाशिक येथील निम्स हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. सचिन देवरे यांच्या देखरेखीखाली पाठवले.

डॉ. देवरे यांनी त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया म्हणजे थोराकोटो्मी करत त्याच्या छातीचा पिंजरा पूर्ववत केला व त्यानंतर ट्रकीओस्टोमी म्हणजे श्वसन नलिकेला होल करून त्यात नळी टाकून त्याला सहा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मधल्या काळात अनेक वेळा किरण मृत्यूच्या दरात जात. परंतु प्रत्येकवेळी योग्य उपचार करत बाहेर काढले. शेवटी मंगळवारी (ता. १३) म्हणजे तब्बल १९ दिवसांनी किरणला हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली.

अनेक वेळा मृत्यूच्या कचाट्यात सापडून सुद्धा दैव, देवदूतांची साथ व स्वतःच्या हिमतीवर किरण पूर्ण बरा झाला. किरणने व नातेवाइकांनी डॉ. सचिन देवरे, हॉस्पिटलमधील कर्मचारी व डॉक्टरांचे आभार मानले.

अभोणा व कळवण येथे तातडीची मिळालेली वैद्यकीय सुविधा निर्णायक होती. क्रिटिकल केअर तज्ञ डॉ. महेश बनसोड, फुफुसांचे तज्ञ डॉ. मयूर देवराज यांनी विशेष मेहनत घेतली. डॉ. पूनम जाधव, डॉ. आनंद कदम, डॉ. तस्निम सिद्दीकी, डॉ. आकाश पाटील, डॉ. वैभव महाजन, डॉ. राजेंद्र कडनर तसेच हॉस्पिटलचे प्रशासक उझैर शकील व हॉस्पिटल स्टाफने रुग्णाची योग्य ती काळजी घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT