Nilesh gaikwad esakal
नाशिक

Success Story: एरोस्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नीलेश गायकवाड; बागलाणच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा

सकाळ वृत्तसेवा

Success Story : तळवाडे-भामेर (ता. बागलाण) येथील मूळ रहिवासी, शिवसंघ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, बागलाणचे भूमिपुत्र कॅप्टन नीलेश गायकवाड यांची पुणे येथील नामांकित एरोस्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध नेमणूक झाली आहे.

पायलट ते असोसिएशनचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास स्वप्नवतच आहे. त्यांच्या निवडीमुळे बागलाणच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा आहे. (Nilesh Gaikwad as President of Aerosports Association honor of Baglan Nashik News)

नामपूर, तळवाडे-भामेर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. ग्रामीण पार्श्वभूमी असतानाही गगन भरारीचे वेड त्यांना अध्यक्ष पदापर्यंत घेऊन आले. गगनाला गवसणी घालणाऱ्या नीलेश गायकवाड यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

'मराठी साहित्य' ही संकल्पना अधिक व्यापक करत ती समग्र भाषा व्यवहाराशी जोडली जावी यासाठी प्रयत्न करणे या हेतूसाठी कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी विश्व मराठी परिषद स्थापन केली. त्यामाध्यमातून गेली अनेक वर्षे परदेशात जागतिक मराठी साहित्य संमेलने भरवली.

सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी शिवसंघ प्रतिष्ठानची स्थापना केली असून युवकांसाठी करिअर, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक खर्चासाठी निधी, वृद्धाश्रम, सामाजिक संस्थांना मदत अशा स्वरुपाची अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या समाजकार्याची, त्याचबरोबर "अंदमान निकोबार पर्यटन" विषयावरील सखोल अभ्यासामुळे वॉशिंग्टन डीसी विद्यापीठाकडून त्यांना "डॉक्टरेट" पदवी बहाल केली आहे. शिक्षक सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गोपाळराव गायकवाड यांचे ते चिरंजीव, सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे ते बंधू आहेत.

संगणक क्षेत्रातही उत्तुंग भरारी

कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी संगणक प्रशिक्षण घेतले. त्यात संगणक जोडणी आणि दुरुस्ती पण शिकून घेतली आणि त्या जोरावर त्यांनी स्वतःचे संगणक विक्री आणि दुरुस्तीचे काम चालू केले.

अहोरात्र कष्ट, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता या बळावर त्यांनी चांगली प्रगती केली. स्वतःची ‘सिलिकॉन वॅली’ नावाची एक संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT