Nilgavhan Goshala appeal farmers to not sell animal nashik news 
नाशिक

Nashik News: जनावरे विकू नका, आम्ही सांभाळतो! दुष्काळी परिस्थितीत निळगव्हाणच्या गोशाळेची साद

गोकूळ खैरनार

Nashik News : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यातच जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरानजीकच्या निळगव्हाण येथील गोवंश रक्षा समितीची गोशाळा जनावरांसाठी तारणहार ठरत आहे.

चारा पाणी नसेल तर जनावरे आम्ही सांभाळतो, पण ते विकू नका या गोशाळेने केलेल्या आवाहनाला कसमादेतील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. (Nilgavhan Goshala appeal farmers to not sell animal nashik news)

गोशाळेकडे १३५ जनावरे संगोपनासाठी सुपूर्त करण्यात आली आहेत. यापुढेही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची गोवंश व इतर जनावरे सांभाळण्याची तयारी गोशाळेने दर्शविली आहे. गोमाता व इतर जनावरांचे दायित्व स्वीकारणाऱ्या गोशाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

निळगव्हाण येथील गोशाळेत गायी, बैल, म्हैस, हेला, बकरी, मेंढी आदी ८२५ जनावरे आहेत. यात गायींचा समावेश अधिक आहे. संस्थेतर्फे त्यांचे संगोपन केले जाते. तालुक्यासह कसमादेत यावर्षी अल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती आहे.

बळीराजा संकटात असताना गोशाळा त्यांच्या मदतीला धावून आली आहे. चारा व पाण्याच्या कारणामुळे कोणत्याही परिस्थितीत जनावरे विकू नका. जनावरांचा आम्ही विनामूल्य सांभाळ करतो. चारा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर जनावरे घेऊन जा असे आवाहन गो शाळेचे अध्यक्ष सुभाष मालू यांनी केले होते. या आवाहनाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

मालेगाव तालुक्यासह कसमादेतील विविध गावांमध्ये १३५ जनावरे शेतकऱ्यांनी संगोपनासाठी गोशाळेकडे सुपूर्द केली आहेत. संबंधित काही शेतकऱ्यांकडे चारा व पाण्याची व्यवस्था झाल्याने त्यांनी त्यांची दुभती जनावरे पुन्हा नेली. गोशाळेत जनावरांना चारा-पाणी बरोबरच त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाते.

गरज पडल्यास औषधोपचार केले जातात. कसमादेत अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. चाऱ्याचा प्रश्‍न आतापासूनच गंभीर होत आहे. हिरव्या चाऱ्याचे दर दुप्पटीने वाढले आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात विशेषत: उन्हाळ्यात जनावरे सांभाळणे जिकरीचे होणार आहे. अशा जनावरांचे दायित्व स्वीकारून त्यांचे संगोपन करण्याची तयारी गोशाळेने दर्शविली आहे.

"दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना शेतकरी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत जनावरे विकू नयेत. ज्यांच्याकडे चारा पाण्याची व्यवस्था नसेल अशा शेतकऱ्यांच्या जनावरांचे आम्ही विनामूल्य संगोपन करू. चारा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर शेतकरी बांधव त्यांची जनावरे कधीही गो शाळेतून घेऊन जाऊ शकतात.

वृक्षतोड थांबविण्यासाठी नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी गोवरीचा वापर करावा. ही सेवा गोवंश रक्षा समितीतर्फे देण्यात येत आहे. गोवरी, कापूर, तूप यासाठी ९३७१२५५२८७, ९४२२२५५२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी कुठलीही रक्कम घेतली जाणार नाही." - सुभाष मालू, अध्यक्ष, गोवंश रक्षा समिती, गोशाळा निळगव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT