Niphad Nagar Panchayat Election Nagar Panchayat Election
नाशिक

अनिल कदम, राजाभाऊ, कुंदेंचा करिष्मा; आमदार बनकरांची लिटमस टेस्ट फेल

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : निफाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) व शहर विकास आघाडीचे राजाभाऊ शेलार, अनिल कुंदेनी बांधलेली मोट यशस्वी ठरली आहे. स्पष्ट बहुमत मिळवत निफाड नगरपंचायतीवर भगवा डौलाने फडकला आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र तीनच जागांवर विजय मिळविता आला असला त्यापैकी दोघे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत. यानिमित्ताने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट विद्यमान आमदार दिलीप बनकर (Mla Dilip Bankar) हारले आहेत.

निफाड नगरपंचायतीत एकुण सतरा नगरसेवक होते, त्यात भाजप आणि शिवसेना प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस, बसपा अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल होते. निफाड हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने निवडणुकीचा बिगुल वाजण्यापुर्वीच इच्छुकांनी आपापल्या परिने जनसेवेची कामे करत चर्चेत राहण्याचा फंडा चालू ठेवला. निफाड नगरपंचायत निवडणुकीसाठी तब्बल त्रेचाळीस उमेदवार रिंगणात उतरले होते. वास्तविक पाहता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर तोच कित्ता गिरविला जाण्याचे संकेत मात्र नेतेमंडळींच्या असमन्वामुळे धुळीस मिळाले. आणि सत्तेचा संघर्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षातच झाला.

निफाडच्या भूमित गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यातील संघर्षात तरुणाई विखुरलेली आहे. त्यामुळे कदम व बनकर यांच्या राजकीय संघर्षाचा अंक निफाडच्या रणागणांत पहायला मिळणार हे सर्वश्रुत होते आणि झालेही तसेच. पहिल्यापासूनच संयमी भूमिका घेत शिवसेना, शहर विकास आघाडी आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन निफाडच्या मैदानामध्ये माजी आमदार अनिल कदम, राजाभाऊ शेलार आणि अनिल कुंदे यांनी यशस्वी नियोजन केले. निफाड नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली तर दुसरीकडे विधानसभेत मिळालेल्या यशाच्या जोरावर निफाड नगरपंचायतीचे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. कदाचित काँग्रेसबरोबर आघाडी केली असती तर वेगळेच चित्र निर्माण झाले असते. तसे न झाल्याने विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसला आहे.

टायगर अभी जिंदा है

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निफाड शहरात भरघोस मते मिळाली होती, मात्र नगरपंचायत निवडणुकीत दिलीप बनकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी नाकारले आहे. आमदार दिलीप बनकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, याउलट शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी शहर विकास आघाडीचे राजाभाऊ शेलार यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करीत शिवसेनेचा भगवा निफाड नगरपंचयातवर फडकून टायगर अभी जिंदा है असा इशारा दिला आहे. मागच्या निवडणुकीत राजाभाऊ शेलार यांनी भाजपचे नेतृत्व केल्याने भाजप शिवसेनेची सत्ता आली होती, यावेळी शेलार यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन शहर विकास आघाडी व शिवसेनेची मोट बांधून निफाड शहरावर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. भाजपला एकही जागा तर मिळाली नाही, शिवाय बहुतेक उमेदवारांचे डोपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेस एक व बसपा १ व १ अपक्ष हे निवडून आलेले उमेदवार शहर विकास आघाडीचा पाठिंबा असलेले आहेत. नगरपंचायत निवडणुकीमध्ये निफाडकरांनी दिलेला कौल हा आगामी तालुक्यातील निवडणुकांची नांदी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT