Unseasonal Rain Grapes Crop Damage esakal
नाशिक

Nashik News: निफाड - घोषणांच्या सुकाळात आशेचा किरण गडदच

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून बिरुद मिरविणाऱ्या निफाड तालुक्याला सरत्या वर्षात अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला...

सकाळ वृत्तसेवा

"महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून बिरुद मिरविणाऱ्या निफाड तालुक्याला सरत्या वर्षात अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, शेतकऱ्यांचे विस्कटलेली आर्थिक घडी, तर राज्याच्या राजकारणातील झालेले बदल थेट निफाडच्या राजकारणात रुंजी घालताना दिसले. या वर्षात केंद्र सरकारने वाढवलेले कांद्याचे निर्यात मूल्य आणि त्यानंतर घातलेली निर्यातबंदीवरून ‘कांदा’ आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला. मंत्र्यांच्या भेटी, पाहणी दौऱ्यानंतर मायमातीतील शेतकरी घोषणांच्या सुकाळात आशेचा गडद झालेला किरण अद्यापही शोधतोय."- माणिक देसाई

(Niphad ray of hope remains dark unseasonal rain damage in drought of announcements by politicians Nashik News)

निफाडच्या सधनतेचा डंका सर्वदूर पसरला आहे. काही वर्षांत बदलत्या नैसर्गिक वातावरण शेती आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस. त्यातून खरिपाची माती झाली.

रब्बीची तयारी करीत असताना, अवकाळीने दस्तक दिल्याने द्राक्ष शेतीचे कंबरडे मोडले. वारंवार होणारी गारपीट उद्धवस्त करणारीच ठरली. लासलगाव बाजार समितीची चुरशीची निवडणूक झाली.

त्यानंतर मनोमिलनात सभापतिपदी मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची वर्णी लागली. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता अबाधित राखण्यात आमदार दिलीप बनकर यांना यश आले, पण बाजार समितीत माजी आमदार अनिल कदम यांच्या रूपाने प्रबळ विरोधकाचा प्रवेश झाला आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याची ‘चिमणी’ यंदाही पेटू शकली नाही.

निफाड सहकारी साखर कारखान्याची जागा ड्रायपोर्टला दिल्यानंतर मिळालेल्या १०८ कोटी रुपयांतून कामगारांची थकीत पगार देणी द्यावी, तसेच निसाका भाडेतत्वावर दिल्याचा करार सार्वजनिक करावा, या कराराची पुनर्रचना करून तो त्रिस्तरीय करावा, या मागण्यांसाठी ‘निसाका’च्या कामगारांनी निफाड कारखान्यावर धरणे आंदोलने केली. निफाड तहसीलवर मोर्चाही काढला.

अतिशय कमी पावसामुळे या वर्षी सोयाबीन व मका पिकाचे उत्पादन कमी मिळाले. सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. पाऊस कमी झाल्याने रब्बी हंगामावरही परिणाम झाला आहे.

पावसाअभावी विहिरींची पाणीपातळी खाली गेल्याने उन्हाळ कांदा लागवड आणि गव्हाच्या क्षेत्रात घट झाली आहे. तालुक्यातील पन्नासवर गावांत २६ नोव्हेंबरला वादळी पाऊस, लिंबाएवढ्या गारपीटीने द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, मका टोमॅटो या पिकांची नासाडी केली.

द्राक्षबागा, कांद्याचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामे करून राज्य शासनला नुकसानीचा अहवाल पाठविला आहे.

त्यानुसार तालुक्यातील १०,६०० हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, ऊस, मका, टोमॅटो, गहू व हरभरा या प्रमुख पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. २२ हजारांवर शेतकरी बाधित झाले आहेत. नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी पुण्याच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या पथकाने केली.

द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाल्याने द्राक्ष बागायतदारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. नुकसानीला वैतागून काही शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षबागा तोडण्यास प्रारंभ केला आहे. निफाड महाविद्यालयात परिवर्त साहित्य संमेलनात साहित्यिकांचा मेळा भरला.

शेतकरी संघटनेची बुलंद तोफ प्रल्हाद पाटील यांची एक्झिट चटका लावून गेली. गोदाकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. अनेक गावांतील घरे, जनावरे व शेतीचे मोठे नुकसान होते.

हे टाळण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणास उर्वरित अतिरिक्त १० वक्राकार गेट बसविण्याच्या प्रस्तावास तत्कालीन जलसंपदामंत्र्यांनी मान्यता दिली. त्यानंतर शासकीय स्तरावर शासकीय कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर निधी उपलब्ध झाला असून, लवकरच हे काम सुरू होऊ शकते, तर निफाड येथे आदिवासी मुला-मुलींसाठी नवीन वसतिगृह उभारण्यात येणार आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या ओझर-चांदोरी जिल्हा मार्गावर खेरवाडी येथे मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपूल प्रवाशांच्या सोयीसाठी खुला झाला आहे. मात्र, सुरत-शिर्डी मार्गावरील कुंदेवाडीच्या रेल्वेपुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT