Nirbhaya Squad News esakal
नाशिक

‘Nirbhaya’ गस्त पथकांची करडी नजर; दिवस-रात्र महिला सुरक्षिततेसाठी गस्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमधील महिला आणि मुलींच्या सुरक्षितता संबंधाने पोलिस दलातर्फे महिला पोलिसांचे निर्भया पथकांच्या गस्तीचे नियोजन करण्यात आले. महिलांना एकीकडे आपण शक्तीस्वरूप मानतो, तर दुसरीकडे त्यांची छेडखानी केली जाते. हा विरोधाभास कशामुळे निर्माण होतो? असा प्रश्‍न आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरात यात्रा, गरबा, दांडिया अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहील.

पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये चार विभागानुसार नेमणूक केलेले निर्भया पथकातर्फे दिवस- रात्र पेट्रोलिंग केली जात आहे. दुसरीकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी प्रबोधनात्मक उपक्रम राबवून मुलींना सायबर साक्षरतासह, लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी एकप्रकारे महिला पोलिसांकडून प्रबोधनाचा जागर केला जात आहे. यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. याच काळात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. ठिकठिकाणी दांडिया, गरब्याचे आयोजन केले जाते.

तरुण - तरुणी मोठ्या संख्येने येत असल्याने त्यातून अनेकदा छेडछाडीचे प्रकार घडून सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. तर, याच काळात सोनसाखळी चोरट्यांकडून महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेण्याचेही प्रकार घडतात. असे प्रकार घडू नये. महिलांना सुरक्षितपणे नवरात्रोत्सव साजरा करता यावा, यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून विशेष महिला पोलिसांच्या निर्भया पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. (Nirbhaya patrol squad gray eyes Day night patrolling for women safety Nashik Latest Marathi News)

शहरामध्ये चार पथके

पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिक रोड असे चार विभाग केले आहेत. याच चार विभागनिहाय पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी या झोनल ऑफिसर असून, सहायक आयुक्त दीपाली खन्ना या नोडल ऑफिसर असून, त्यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकांची नियुक्ती केली आहे. एका पथकामध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यासह चार कर्मचारी आहेत. ही पथके सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री अकरापर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये या पथकामार्फत पेट्रोलिंग केले जाते.

कालिका मंदिर परिसर, भगूर येथील रेणुकामाता मंदिर परिसरामध्ये महिलांची गर्दी असल्याने येथे पथकातील महिला पोलिस साध्या वेशात गस्तीवर आहेत. नवरात्रोत्सवात प्रामुख्याने मध्यरात्री ते पहाटे दर्शनासाठी महिलांचे येण्याचे प्रमाण मोठे असते. या वेळी मुली तसेच महिलांची छेडखानी, सोनसाखळ्या हिसकावणे, लूट असे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेत कडक पोलिस बंदोबस्त असला तरी महिलांसाठी खास रात्री गस्ती पथकांचे नियोजन केले आहे.

पहाटे ४ ते सकाळी ९ व सायंकाळी ६ ते रात्री ११ अशा विविध वेळातही साध्या वेशातील पथके गस्त घालत आहेत. याशिवाय, निर्भया पथकांमार्फत जॉगिंग ट्रॅक, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आदी वर्दळीच्या ठिकाणी छेडछाड करणाऱ्यावर कारवाई केली जाते. जेणेकरून छेडछाड करणाऱ्‍यांवर अंकुश ठेवता येईल.

जाणीव-जागृतीसह कायद्याची माहिती

निर्भया पथकामार्फत महिलांमध्ये सुरक्षिततासंदर्भात जनजागृती, सायबर क्राइमची माहिती व्हावी, ओळखीचे वा अनोळखीच्या व्यक्तीकडून लैंगिक शोषण होत असेल तर याविरोधात आवाज उठवावा यासंदर्भात शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात.

निर्भया पथकाच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह महिला अधिकारी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन महिला सुरक्षिततासंदर्भात व्याख्यान देतात. महिलांमध्ये जाणीव- जागृतीसह महिलांविषयक कायद्याची माहिती दिली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्यातच याचीही माहिती दिली जाते. तर, मुलींचे लैंगिक शोषण होत असल्यास त्याबाबत यांनी पालकांना, पोलिसांना संपर्क साधावा असेही आवाहन केले जाते.

संपर्क क्रमांक

* निर्भया पथक १ (पंचवटी, आडगाव, म्हसरुळ) : ९४०३१६५८३०

* निर्भया पथक २ (सरकारवाडा, गंगापूर, भद्रकाली, मुंबई नाका) : ९४०३१६५६७४

* निर्भया पथक ३ (अंबड, इंदिरानगर, सातपूर) : ९४०३१६५५०६

* निर्भया पथक ४ (उपनगर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प) : ९४०३१६५१९३

* टोल फ्री : ११२ आणि १०९१

मानवतेच्या प्रतिष्ठित संपूर्ण गुणांची जननी

यत्र पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:।

संस्कृतमधील हा श्‍लोक. अर्थात, महिलांची जिथं पूजा होते, तिथं देवता निवास करतात. महिला दिव्य स्वरूप, प्रेम, करुणा, दया याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी असे महिलांचे स्वरूप असते. म्हणजेच काय, तर महिलांविना सृष्टीचे रुप अपूर्ण आहे. म्हणून महिलांना सृजनात्मक शक्तीचे प्रतीक मानले गेले. महिला या मानवतेची जननी असतात. मानवतेच्या संपूर्ण गुणांची जननी असते.

"नवरात्रोत्सवात नव्हे तर एरवी निर्भया पथकाकडून शहरात पेट्रोलिंग केली जाते. नवरात्रोत्सवात गस्तीचे प्रमाण वाढविले जाते. जेणेकरून कुठेही महिलांना त्रास होऊ नये. त्यांना सुरक्षितपणे नवरात्रोत्सव साजरा करता यावा. त्यांना होणाऱ्या समस्येबाबत निर्भया पथकाच्या चारही विभागाशी संपर्क साधता येऊ शकतो." - दीपाली खन्ना, सहायक आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT