Near Old Bus Station in Malegaon City. Protesting against the statue of BJP MLA Nitesh Rane near Babasaheb Ambedkar statue esakal
नाशिक

Nashik NCP News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितेश राणे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : केंद्र व राज्यातील भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळेच आमदार नितेश राणे सारखे काही जण वाटेल ते बेताल वक्तव्य करुन हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यापुर्वीही राणे यांनी मालेगाव संदर्भात लव जिहाद, भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमण व आता लॅंण्ड जिहाद तसेच रोहिंग्या व बांगलादेशी मुस्लीमांचा घुसेखोरीचा आरोप केला आहे. शहरात एकही रोहिंग्या व बांगलादेशी मुस्लीम आढळून आल्यास आपण राजकारणातून संन्यास घेवू. राणे यांना अटक करावी.

त्यांच्यावर कारवाई करावी. मालेगावची सततची बदनामी सहन केली जाणार नाही असा इशारा माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी मंगळवारी (ता. ३) येथे दिला. (Nitesh Rane jodo maro andolan movement by NCP at malegaon Nashik political News)

मुंबई येथील पत्रकार परिषदेत आमदार राणे यांनी मालेगाव शहरात बांगलादेशी व राेहिंग्या मुस्लीमांच्या वस्त्या वाढत आहेत. गुंठेवारी खरेदी बेकायेशीरपणे सुरु असल्याचा आरोप केला होता.

त्याच्या निषेधार्थ श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारत लाक्षणिक आंदाेलन केले.

त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. शेख बोलत होते. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन अप्पर पाेलीस अधिक्षक अनिकेत भारती यांना निवेदन सादर करुन राणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासुन दुपारी एकला आंदोलनाला सुरवात झाली. आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे मुर्दाबाद, नितेश राणे की दादागीरी नही चलेगी अशा घोेषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदाेलन केले.

श्री. शेख यांनी राणे यांच्यावर जोरदार टिका केली. शहराला बदनाम करण्याचा कट ते रचत आहेत. त्यातुनच लव जिहाद, किल्ला झोपडपट्टी अतिक्रमण, लँण्ड जिहाद, बांगलादेशी रोहिंग्या मुस्लीमांची घुसेखोरी असे बिन बुडाचे आरोप करीत आहेत. यामागे जातीय दंगली घडवून आणण्याचा उद्देश आहे.

राज्यातील हिंदू-मुस्लीम, शिख, ईसाई व दलीत बांधव त्यांचा हा डाव ओळखून आहेत. त्यांना ते धडा शिकवतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंञ्यांनी त्यांच्या आरोपांची चौकशी करावी. राणे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा राणे यांना आगामी काळात शहरात प्रवेश करु देणार नाही.

आंदोलनात कार्याध्यक्ष एजाज अहमद उमर, माजी सभागृहनेता मोहम्मद अस्लम अन्सारी, फारुक कुरेशी, रफीक अहमद शेख बशारत, शकील अहमद, माजी नगरसेवक सलीम अन्वर, रफीक शेख अफजल आदींसह प्रमुख पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT