Nitin Bhau More Guidance regarding Plant trees, become environment friendly nashik news esakal
नाशिक

Nitinbhau More : वृक्ष लावा, पर्यावरण मित्र बना! : नितीनभाऊ मोरे

सकाळ वृत्तसेवा

Nitinbhau More : जागतिक तापमानवाढीचा धोका ओळखून परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी पर्यावरण संतुलनासाठी दिलेल्या सव्वा कोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियानात सर्वांनी सहभागी होऊन पर्यावरण मित्र म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीनभाऊ मोरे यांनी मंगळवारी (ता. १) केले. (Nitin Bhau More Guidance regarding Plant trees, become environment friendly nashik news)

श्री. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामशेज किल्ल्यावर महावृक्षारोपण आणि सीडबॉल उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी सेवेकऱ्यांना श्री. मोरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की मानवाने आज निसर्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. झाडांची बेसुमार कत्तल होत असून, पर्यावरणावर घाला घातला जातो.

त्यामुळे गुरुमाउलींच्या आज्ञेनुसार सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे राज्यासह देशभर सव्वा कोटी महावृक्षारोपण आणि संवर्धन अभियान राबविले जात आहे. गतवर्षी तब्बल ११ लाख रोपांची लागवड झाली; तर यंदा तब्ब्ल ४० लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानाचे हे द्वितीय पर्व सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबरोबरच सीडबॉल उपक्रमही सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत या दोन्ही उपक्रमांत सर्व वयोगटांतील सेवेकरी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. वृक्षारोपणानंतर त्या रोपांची देखभाल-संवर्धनही केले जाते. गुरुमाऊलींनी दिलेला हा आगळावेगळा उपक्रम असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असा पुनरुच्चार त्यांनी केला.

३०० झाडे व ३५०० सीड बॉल

नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामशेज किल्ल्यावर ३०० रोपांची लागवड आणि तीन हजार ५०० सीडबॉल्सचे रोपण करण्यात आले. नाशिकमधील पंचवटी, मखमलाबाद, म्हसरूळ आणि विवेकानंदनगर केंद्रातील २०० हून अधिक सेवेकरी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते.

गावचे सरपंच साहेबराव मालेकर, उपसरपंच संदीप कापसे यांनी सहभागी होऊन सेवामार्गाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी काजू, पिंपळ, हनुमानफळ, पापडा, कांचन, हिरडा, जांभूळ, करंज, पांगारा, शेंद्री, शिरस आदींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT