NMC Anniversary Program : शहर विकास करताना नवनवीन तंत्रज्ञान वापरात येत आहे. महापालिकेचे प्रशासनातील ४१ वर्षातील काम अभिमानास्पद आहे.
भविष्यात शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करून शहर विकासात युवकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. (NMC Anniversary Program Jalaj Sharma statement Involve youth in city development nashik)
महापालिकेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. ७) महाकवी कालिदास कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, आरोग्याधिकारी तानाजी चव्हाण, वित्त व लेखा अधिकारी सुरेखा जाधव, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रदीप चौधरी यांनी केले. जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता आहे, असे असले तरी नव तंत्रज्ञानाची जोड देत युवकांना सहभागी करून घेतले पाहिजे. असे नमूद केले.
वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संर्वधनाचे काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा विजेत्यांची घोषणा करण्यात आली. सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले. तर श्रीकांत पवार यांनी आभार मानले.
या संस्थांचा सन्मान
रोज सोसायटी : धनंजय गुजराती, हिरवांकूर फाउंडेशन : शहाजी व राखी शहाजी. नॅशनल एनवोर्मेन्ट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. राहुल व्यवहारे, लिबर्टी अर्थवेअर, हेमंत जोरवेकर, वंदना जोरवेकर, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, डॉ. मनीषा रौंदळ, किशोर माने, विद्यमान पदाधिकारी व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची टीम.
एनसीसी महाराष्ट्र बटालियन कॅडेट्स. एनयुएलएमच्या पल्लवी वक्ते, रंजना शिंदे. प्रथमेश जाधव, नितीन रायते व महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणारे युवा स्वयंसेवक.
सायक्लोन डान्स अॅकॅडमी, प्लॉगर्स ग्रुप, स्वप्नपूर्ती फाउंडेशन, स्मॉल हेल्पिंग हॅन्ड आदींचा पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेतर्फे सन्मान करण्यात आला.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेतील विजेते
प्रथम : योगेश पाटील, द्वितीय- नीलम पाटील, तृतीय- अपर्णा नाईक. पुरस्काराचे स्वरूप प्रथम- दहा हजार, द्वितीय- पाच हजार, तृतीय- तीन हजार व स्मृतिचिन्ह असे आहे.
गायन, नृत्याची मेजवानी
महाकवी कालिदास कलामंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमात गायन, नृत्य, गिटार वादन, वक्तृत्व आदी कार्यक्रमांची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मेजवानी मिळाली. कार्यक्रमाची सुरवात संयुक्ता भालेराव, विजय पाटील यांच्या गणेशवंदना नृत्याने झाली.
कार्यकारी अभियंता गणेश मैद यांनी मंदिरात नाही दिसला सावला देवा मी तुझा सोनार हा प्रकार सादर केला. उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची कन्या भाविका मुंडे यांनी पियानो वादन करून रसिकांची दाद मिळविली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवकुमार वंजारी यांनी गायन केले. ललिता बागूल यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले.
प्रथमेश जाधव यांनी मेरा माटी मेरा देश अभियानावर मायमिंग केले. सुरेश पवार यांनी हिंदी व मराठी चित्रपट गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही नृत्य व समूह नृत्य सादरीकरण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.