नाशिक : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काटकसरीने पाणी वापराचे आवाहन केले आहे. शहरात कुठे पाणी गळती आढळल्यास त्वरित महापालिकेला कळविण्यासाठी महापालिकेने उपअभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहे. (nmc appeal to citizens use water carefully)
पाण्याचा अपव्यय टाळा...
उन्हाळ्याच्या झळा वाढल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी नाशिक शहरामध्ये पाणी बचतीबाबत नियोजन सुरू आहे. त्याअंतर्गत महापालिकेने (NMC) नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणी शिळे होत नाही, उरलेले पाणी फेकू नका, अंघोळीसाठी शॉवरचा वापरु नये. घरांच्या पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होणार नाही याची काळजी घ्यावी. टाकीत बॉल व्हॉल्व व सेंसरचा वापर करणे. वाहने नळीचा वापर करून धुऊ नये. अंगणात अथवा रस्त्यावर सडा मारुन पाण्याचा अपव्यय करू नये. नळ कनेक्शनला डायरेक्ट मोटर/पंप बसवू नये. पाणी साठविण्यासाठी जमिनीत टाकी बांधावी, असे आवाहन केले आहे.
विभागनिहाय संपर्क क्रंमाक
विभाग पाणी पुरवठा विभाग उप अभियंता भ्रमणध्वनी क्रमांक
- नाशिक पूर्व (०२५३) २५९२९३३ / ९९२२४४४७८८ ९४०४९८४२२२
- नाशिक पश्चिम (०२५३) २५८२३४८ /९४२३१७९१२३ ९८५०९६०२६६
- पंचवटी (०२५३) २५१३४९० / ९४२३१७९१६९ ९८९०६४६०३६
- नाशिक रोड (०२५३) २४६०२३४ / ९६०७२६१२१२ ८६९८६९१९९७
- सिडको (०२५३) २३९०७३८ / ९६०७०२४५४५ ९०११०१४६८८ / ९४२३१७९१८१
- सातपूर (०२५३) २३६३६०९ / ९४२३१३१३२१ ९४०३५६०९६४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.