NMC School esakal
नाशिक

Ideal Teacher Awards: NMCचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर! 15 शिक्षकांचा समावेश; शनिवारी वितरण सोहळा

सकाळ वृत्तसेवा

Ideal Teacher Awards : महापालिका शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. गेल्या काही वर्षात प्रथमच शिक्षक दिनी पुरस्कार जाहीर होत आहे. पंधरा शिक्षकांची घोषणा शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी केली.

शासन सूचनेनुसार गठित केलेल्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार प्राथमिक मराठी विभागातून नऊ, प्राथमिक उर्दू विभागातून एक, खासगी प्राथमिक शाळा दोन,

माध्यमिक विभागातून दोन व केंद्रप्रमुख विभागातून एक अशा पंधरा पंधरा शिक्षकांची उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. (NMC Best Teacher Awards Announced Included 15 teachers Distribution ceremony on Saturday nashik)

समितीने शिक्षण विभागाकडे प्राप्त प्रस्तावांची छाननी करून मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल, स्थानिक सहभागातून उपक्रम सामाजिक कार्य वैशिष्ट पूर्ण उपक्रम, गुणवत्ता, विकासात संबंधित वर्गाचे कामकाज, चाचणीचे निकाल गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न वर्ग पातळीवरील उपक्रम, कृती संशोधन,

शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परिक्षा, विज्ञान प्रदर्शन व सहभाग, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेले प्रयत्न, राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, कोविड काळातील उपक्रम, ऑन लाईन शिक्षण, लोक सहभाग, प्रकाशित लेख आदी सर्व निकषांचा अभ्यास करून शिक्षकांची निवड केली.

समितीचे अध्यक्ष व महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, उपाध्यक्ष व अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, राज्य पुरस्कार विजेते शिक्षक पंडित सोनवणे, डीएड महाविद्यालयाच्या प्राचार्य मनिषा देवरे, सदस्य सचिव व शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी काम पाहिले.

शनिवारी (ता. ९) कालिदास कलामंदिरात पुरस्कार सोहळा होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यांचा होणार गौरव

- वैशाली अशोक क्षीरसागर (उपशिक्षक), तोरणानगर शाळा क्र. ७०

- श्रीकृष्ण सीताराम वैद्य (उपशिक्षक), वडनेर दुमाला शाळा, अंबड.

- जयश्री पंकज मराठे (उपशिक्षक), शाळा क्रमांक ७७, अंबड.

- दत्तात्रेय निंबा शिंपी (उपशिक्षक), शाळा क्रमांक २८, सातपूर कॉलनी.

- किरण देविदास वाघमारे (उपशिक्षक), शाळा क्र.४९, जेलरोड.

- रोहिणी हिरामण मंडळ (उपशिक्षिका) शाळा क्र. ११, मखमलाबाद नाका

- अनंत तुळशीराम शिंपी (उपशिक्षक), शाळा क्रमांक १३.

- सविता भीमराव बोरसे (उपशिक्षिका), शाळा क्र. २१.

- श्रुती राहुल हिंगे, शाळा क्र. ८२.

प्राथमिक शाळा उर्दू माध्यम

- काझी जहाँआरा मोईनुद्दीन , शाळा क्र. ३१, सातपूर.

माध्यामिक विभाग

- राजेंद्र भिका सोनार (मुख्याध्यापक), मनपा माध्यमिक शाळा, सातपूर.

- बाळासाहेब चांगदेव आरोटे (उपशिक्षक)

खासगी प्राथमिक शाळा

- ज्योती खंडेराव फड (उपशिक्षक), नूतन मराठी प्राथमिक शाळा.

- किरण गणेश शिरसाट (उपशिक्षक), सरस्वती प्राथमिक विद्यालय.

- मंगला दीपक पवार (केंद्र प्रमुख, केंद्र क्रमांक सात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT