NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: मनपाने बदलली 81 जातिवाचक गल्ल्यांची नावे! तांबट लेन, तेली गल्ली नामकरणाला विरोध

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहरात पारंपरिक पद्धतीने नामकरण झालेल्या रस्ते, वस्त्यांचे जातिवाचक नावे बदलण्याचा ठराव मंजूर झाला असला तरी बाजारपेठेतील काही जातिवाचक नावे बदलण्यास तेथील स्थानिक नागरिकांनीच विरोध केला आहे.

रविवार कारंजावरील तांबट लेन व तेली गल्ली हे नाव बदलू नये, अशा आशयाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्याने सरकारचा आदेश पाळायचा की स्थानिकांची मागणी पूर्ण करायची, अशी अडचण झाली आहे. (NMC changed names of 81 caste streets Opposition to Tambat Lane Teli Galli renaming nashik)

राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून मे २०२१ मध्ये कायदा पारित करून राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्‍त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले.

त्यानुसार शहरातील रस्ते व वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. विशेषतः गावठाणामध्ये मोठ्या प्रमाणात जातिवाचक नावाच्या गल्ल्या व रस्त्यांना नावे आहेत.

अनेक वर्षांपासून ही नावे असली तरी सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून नावे बदलण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. शहरात एकूण 81 जातिवाचक रस्ते, गल्ली, कॉलनी व नगरांना नावे होती.

विभागीय स्तरावर महापालिकेने गठित केलेल्या समितीमार्फत नवीन नावे घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत मंजुरी आल्यानंतर शासनाला अहवाल सादर करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी आहेत गल्ल्यांची जातिवाचक नावे (कंसात बदललेले नाव)

- पूर्व विभाग

जुनी तांबट गल्ली (ओंकार लेन), कुंभारवाडा (भूमिनगर), माळी गल्ली (निसर्ग गल्ली), तेली गल्ली ( रामशेज गल्ली), मातंगवाडा (स्वाभिमाननगर), राजवाडा (प्रगतीनगर), कोकणीपुरा (जनतानगर), कोळीवाडा (कौशल्यनगर ), माळी गल्ली (निर्मल गल्ली), बुरूड गल्ली (यशवंत गल्ली), जोगवाडा (शरयूनगर), मुलतानपुरा (शहीदनगर), साळी गल्ली (शांतिनगर), काझीपुरा (इन्कलाब नगर), वैदुवाडी (अहिंसानगर), आदिवासी वाडा (क्रांतीनगर), माळी गल्ली (उपासनानगर), रामोशी वाडा (सहकारनगर).

पश्चिम विभाग

नवीन तांबट लेन (संस्कृती लेन), लोणार लेन (विवेक लेन), मातंग वाडा (मुक्तीवाडा) ख्रिश्चन वाडी (जयपूर नगरी), कुंभारवाडा (धरतीनगर), साळीवाडा (स्नेहनगर ), जुने तांबट लेन (चैतन्य लेन) काजीगडी (गोदागडी).

पंचवटी विभाग-

वैदुवाडी (पैनगंगानगर), मांगवाडा (नर्मदानगर), धनगर गल्ली (जयहिंदनगर), जोशी वाडा (रायगडनगर), तांबोळी नगर (वेदश्री नगर), भराडवाडी (रायरेश्वरनगर), वडारवाडी (रामशेजनगर), मोठा राजवाडा (सिंधूनगर), नाथ गल्ली (आनंदी नगरी), पाथरवट लेन (कमल नयन लेन), कोमटी गल्ली (देवगिरी नगरी), भोईवाडा (जनस्थाननगर), कुंभार गल्ली (कलाकृतीनगर), चांभार गल्ली (त्रिकटकनगर), कोळीवाडा (हुतात्मानगर).

नाशिक रोड विभाग

बौद्धवाडा (समतानगर), गोसावीनगर (आराधनानगर), गवळीवाडा (राधानगरी), बौद्धनगर (नालंदानगर), लिंगायत कॉलनी (तक्षशिला कॉलनी), गोसावी वाडी (जुईनगर), धोबी गल्ली (कल्पवृक्षनगर), महावीरनगर (रायगडनगर), जैन कॉलनी (सम्यकनगर), बौद्धवाडा (गोकुळधाम), मांगवाडा (गोवर्धननगर), धनगर गल्ली (टायगर गल्ली), तेली गल्ली (प्रगतीनगर), भोई गल्ली (विकासनगर), वाल्मीकनगर (निर्माणनगर), कुंभार गल्ली (कुशलनगर), चांभारवाडा (क्रांतीनगर), लोहार गल्ली (कामगारनगर).

सिडको विभाग

हाजीनगर (खुशबूनगर) झेनत नगर ( महेकनगर), हरदास कॉलनी (गुंजन कॉलनी), भिलवाडा (सहजीवननगर), कोळीवाडा (श्रमिकनगर), कोळीवाडा (कर्मयोगीनगर), विश्वकर्मा (आविष्कारनगर).

सातपूर विभाग

कोळीवाडा (गोदावरीनगर), जोशीवाडा (रायगडनगर), कोळीवाडा (सागरवाडा), कोळीवाडा (अंजनेरीनगर), माळी कॉलनी (मयूर कॉलनी), कोळीवाडा (नंदिनीनगर).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections : महायुतीचं ठरलं! भाजप मोठा भाऊ, १५५ जागांवर लढणार? शिंदे-पवारांना 'इतक्या' जागा

IND vs NZ: भारताविरुद्ध लढण्यासाठी CSK ची कशी झाली मदत? शतकवीर रचिन रविंद्रने केला खुलासा

Latest Maharashtra News Updates Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मुक्काम

Railway News: वांद्रे टर्मिनस ते लालकुवादरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन, या तारखे पासुन सुरु होणार आरक्षण

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्राची मोठी डील; 4,100 कोटींना खरेदी करणार परदेशी बँक, शेअर्स वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT