नाशिक : विनापरवाना वृक्ष तोडल्याप्रकरणी (Without Permission tree cutting) महापालिकेने (NMC) खासदार पूत्र अजिंक्य गोडसे व योगेश ताजनपूरे यांना तब्बल ४ लाख २० हजारांचा दंड ठोठावला आहे. नाशिक रोड पोलिसांच्या मदतीने महापालिकेने तोडलेल्या लाकडाचा एक टेंपो जप्त केला आहे. खासदार पुत्रानेच वृक्षतोड कायद्याचे उल्लंघन केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. सात दिवसांच्या आत दंड न भरल्यास महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन (Maharashtra Urban Area Tree Conservation) अधिनियम १९७५ कलम ८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने काढलेल्या नोटिशीतून दिला आहे. (NMC MPs son fine of Rs 4 lakh for illegally cutting tree Nashik News)
उपायुक्त दिलीप मेणकर हे सिन्नर फाटा परिसरात गुरुवारी (ता. ९) सकाळी स्वच्छतेची पाहणी करत होते. या वेळी त्यांना जुना ओढा रोड, खर्जुल मळा उड्डाणपुलाच्या जागेतील सर्व्हे १९३/२० येथे झाडे तोडून ती टेंपो या वाहनात टाकलेली दिसली. वृक्ष तोडण्यासाठी परवानगी घेतली आहे का, याची विचारणा उपायुक्त मेणकर यांनी त्या वाहनधारकाकडे केली. त्या वाहनधारकाने काही माहिती नसल्याचे सांगितले. पुढे ही झाडे अजिंक्य हेमंत गोडसे, योगेश ताजनपूरे यांच्या सांगण्यावरून अवैधरीत्या वृक्ष तोडल्याचे समजले. यानंतर महापालिकेने या दोन्हींच्या नावाने नोटीस काढत ४ लाख २० हजारांचा दंड ठोठावला.
प्रारंभी ही नोटीस घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर महापालिकेचे नाशिकरोडचे उद्यान निरीक्षक एजाज शेख, पठाडे यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी पत्र दिले. तसेच, संबंधितांनी दंड भरला नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वृक्षांच्या प्रजातीनुसार मूल्ये ठरवले असून, यात काटेरी बाभूळ या प्रजातीचे विविध वृक्षानुसार त्यांचे दर ठरवण्यात आले आहे.
वृक्ष संख्या- मूल्यांकनानुसार दंडाची रक्कम
रेनट्री १ वृक्ष - १ लाख
काशीद १ वृक्ष- ६० हजार
काटेरी बाभूळ १- १ लाख
काटेरी बाभूळ १- ४० हजार
काटेरी बाभूळ १- ४० हजार
काटेरी बाभूळ १- ४५ हजार
काटेरी बाभूळ १- ३५ हजार
"सिन्नर फाटा परिसरात गुरवारी सकाळी स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना या वेळी टेंपोमध्ये लाकडे तोडलेली दिसली. वृक्ष तोडण्याची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न उपस्थित वाहनधारकाला केला. तेव्हा पुढे समजले, की ही झाडे तोडण्यासाठी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. सात वृक्षांचे ठरलेल्या मूल्यांप्रमाणे दंडात्मक कारवाईची नोटीस संबंधितांना पाठवली आहे." - दिलीप मेणकर, उपायुक्त, मनपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.