NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: शहराची लोकसंख्या साडेबावीस लाख; पाणीगळती 28 टक्क्यांवर! अडीच लाख तरल लोकसंख्या

सकाळ वृत्तसेवा

NMC News : कोरोनामुळे जनगणना झाली नसली तरी महापालिकेने केलेल्या वॉटर ऑडिटमध्ये शहराची लोकसंख्या बावीस लाख ३४ हजार नोंदविली गेली आहे.

त्यातही तरल लोकसंख्या (फ्लोटिंग) जवळपास अडीच लाख असल्याने पंचवीस लाखांच्या आसपास शहराची लोकसंख्या पोचली आहे. (NMC city population of twenty two half lakhs Water leakage at 28 percent Two half million liquid population nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

देशात वेगाने वाढणाऱ्या शहरामध्ये नाशिक चौथ्या क्रमांकावर असल्याचा एक अहवाल कोविडपूर्वी प्रसिद्ध झाला होता. कोविडपूर्वी २०१८ मध्ये जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाख ८५ हजार नोंदविली गेली होती. २०२१ मध्ये शहरात जनगणना अपेक्षित होती.

परंतु कोविडमुळे जनगणना झाली नाही. परंतु २०१८ मध्ये महापालिका तसेच स्मार्टसिटी कंपनीकडून वॉटर ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये शहराची लोकसंख्या २२ लाख ३७ हजार नोंदविली गेली आहे.

त्याचबरोबर जवळपास अडीच लाख लोकसंख्या तरल नोंदविली गेली आहे. पर्यटन, उद्योग धंद्याच्या निमित्ताने लोक दिवसभरात ये-जा करतात, असे त्यात नमुद करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने शहरात पाणीपुरवठ्याच्या सुविधा त्याचप्रमाणे भविष्यातील पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे.

वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा

पाणीपुरवठा विषयक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापालिकेने २०१८ मध्ये वॉटर ऑडिट केले. त्यात अंदाजित लोकसंख्या २२ लाख ३४ हजार निश्चित करण्यात आली. त्याचबरोबर शहरात २८ टक्के पाणीगळतीची नोंद करण्यात आली आहे.

दरडोई पाण्याचा वापर दिडशे दशलक्ष लिटर नोंदविला गेला. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने महापालिकेने यंदा ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदविली आहे. त्यानुसार शहराला पाणी वाढवून मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT