Municipal Commissioner Dr. Maharashtra Chamber Vice President Kantilal Chopra welcoming Ashok Karanjkar. esakal
नाशिक

Nashik News: व्यापार, उद्योग संघटनांच्या साहाय्याने शहराचा विकास : आयुक्त डॉ. करंजकर यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची भेट घेत स्वागत केले.

महाराष्ट्र चेंबरसह व्यापार, उद्योग संघटनांच्या मदतीने शहराचा विकास करू, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले. (nmc Commissioner Dr Karanjkar assurance Development of city with help of trade and industry associations Nashik News)

महापालिका क्षेत्रातील व्यापार, उद्योग व कृषिक्षेत्र संबंधित चर्चा केली. तसेच कुंभमेळ्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळविणे, टास्क फोर्स तयार करण्याबाबत चर्चा केली.

राज्यात महाराष्ट्र चेंबरतर्फे राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची व महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा यांनी आयुक्त करंजकर यांना दिली. तसेच, महाराष्ट्र चेंबर पत्रिका भेट दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील व्यापार, उद्योग, कृषिक्षेत्राच्या विकासाबाबत व शहराच्या सर्वांगिण विकासात संघटनांची भूमिका व सहकार्य महत्त्वाचे आहे असे नमूद केले. महाराष्ट्र चेंबर व सर्व व्यापारी औद्योगिक संघटनांशी चर्चा करून सर्वांच्या सहकार्याने शहराचा विकास करू अशी ग्वाही दिली.

शिष्टमंडळामध्ये उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन संजय सोनवणे, कार्यकारिणी सदस्य रणजितसिंग आनंद, नेहा खरे, सहायक सचिव अविनाश पाठक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT