NMC News : शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असताना दुर्लक्ष करणाऱ्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या बेबंधशाहीपणे वागण्याचा अनुभव खुद्द विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना आला.
महापालिकेसंदर्भात बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देऊनही डहाळे हजर राहिल्या नाही. परंतु, आपल्याला निरोपच मिळाला नसल्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या आहेत. (NMC Commissioners meeting Encroachment deputy commissioner Karuna Dahale in trouble nashik news)
शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत आहे. मेनरोड, शिवाजी रोड, शालिमार, रविवार कारंजा तसेच शहरातील उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढले असताना अतिक्रमण उपायुक्तांचे लक्ष नाही.
अतिक्रमण संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑनलाइन तक्रारीकडे लक्ष दिले जात नाही. या अनुषंगाने आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार असलेल्या राधाकृष्ण गमे यांनी महापालिका मुख्यालयातील कामकाजाला शिस्त लावण्याचा अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.
त्या वेळी अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे अनुपस्थित राहिल्या. त्यानंतर त्यांच्यावर विनावेतन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु, कार्यालयातच असताना मला निरोप न मिळाल्याचा खुलासा उपायुक्त डहाळे यांनी केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे खातरजमा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना गमे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना दिल्या. मुख्यालयातील शिस्तीचा भाग म्हणून आयुक्त गमे यांनी ई- मूव्हमेंट रजिस्टर संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर आता महापालिकेच्या महापौरांच्या रामायण निवासस्थानाकडील गेट सकाळी बारा ते सायंकाळी पाच या कालावधीतच खुले ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता एकाच गेटमधून जावे लागणार आहे.
"अतिक्रमण उपायुक्त करून डहाळे यांच्या कार्यालयातील हजेरी संदर्भातील निर्णय सीसीटीव्ही कॅमेरे बघून घेतला जाईल. त्यानंतर विनावेतन कारवाई संदर्भात निर्णय घेऊ."
- मनोज घोडे- पाटील, उपयुक्त, प्रशासन.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.