नाशिक : शहरातील कोरोना संसर्ग (Corona virus) दर पाच टक्क्यांच्या आत आला आहे. मात्र दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान केअर फंडातून (PM care fund) नाशिक महापालिकेला पाठविलेले व्हेंटिलेटर (Ventilator) धूळखात पडून आहे. त्यामुळे आता कंपनीने संबंधित व्हेंटिलेटर कार्यान्वित करून न दिल्यास ते परत पाठविण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे.
(Nashik Municipal Corporation decided to send back the ventilator)
कंपनी काही फिरकेना...
दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्ग (Corona second wave) टिपेला पोचला असताना नागरिकांना बेडसाठी आंदोलने करावी लागली. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळविणे दुरापास्त झाले होते. लोकांचे जीव वाचविण्यासाठी आहे, त्या वैद्यकीय साधनसामग्रीचा काटकसरीने वापर करण्याची वेळ आली असताना पीएम केअर फंडातून महापालिकेला ६० व्हेंटिलेटर मिळाले. मात्र, ज्या कंपनीकडून ते मिळाले त्या कंपनीचे तंत्रज्ञ त्यानंतर फिरकले नाहीत. व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञ नाही, स्टँड, कनेक्टर नाही, अशा अनेक अडचणींमुळे कोरोनाची दुसरी लाट मावळली; पण व्हेंटिलेटर नाशिककरांच्या उपयोगात आलेच नाही. परिणामी ते परत पाठविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
संसर्ग दर घटला
आजमितीस ग्रामीण भागाचा संसर्ग दर जास्त असला, तरी शहरातील कोरोना संसर्ग दर पाच टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निकषानुसार नाशिकची वाटचाल पूर्ण अनलॉकच्या दिशेने सुरू झाली आहे. पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतून नाशिकची बाहेर पडण्याची धडपड सुरू आहे. दोन लाटा संपत आल्या. परंतु पीएम केअर फंडातील ६० व्हेंटिलेटर कार्यान्वित झालेच नाहीत. त्यामुळे आता महापालिकेला ते सगळे केंद्र शासनाला परत पाठविण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
''पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर संबंधित कंपनीकडून कार्यान्वित झाले नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटर महापालिकेच्या तांत्रिक पथकाकडून तपासून घेतले. ते कार्यान्वित झालेच नसल्याने परत पाठविण्यात येणार आहे.'' -कैलास जाधव, आयुक्त, नाशिक मनपा
(Nashik Municipal Corporation decided to send back the ventilator)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.