Prime Minister Narendra Modi interacted with the students during Pariksha Pe Charcha programme. esakal
नाशिक

NMC Digital School: स्मार्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद! डिजिटल बोर्डाचा वापर; विद्यार्थ्यांना नवा अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पे चर्चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पे चर्चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला.

दर वर्षांपेक्षा यंदा स्मार्ट वॉर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांची संवाद साधण्याचा नवा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. (NMC Digital School Smart School students interact with Prime Minister use of digital board new experience for students nashik)

स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडून येत असून २९ हजार विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकच वाव मिळतं आहे.

स्मार्ट स्कूल प्रकल्पात विशेष प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना अध्यापन पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळतं आहे.

पाच वर्षांसाठी महापालिकेच्या शिक्षकांना वर्षातून दोनदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्टसिटीमार्फत एकूण ८२ शाळांचे स्मार्ट स्कूलमध्ये रूपांतर केले जात आहे.

प्रकल्पांतर्गत ८२ शाळांमध्ये ६५६ स्मार्ट क्लासरूम, डिजिटल अभ्यासक्रम, ६९ संगणक कक्ष, सीसीटीव्ही, शाळा प्रशासन प्रणाली (सॉफ्टवेअर) सुविधा पुरविल्या आहे. प्रकल्पासाठी पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

डिजिटल फळा वापरणे, डिजिटल अभ्यासक्रम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील ॲप्लिकेशन्स वापर, इंटरनेट ॲप्लिकेशन्स वापर, स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापर यासंदर्भात प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहे.

प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. डिजिटल सामग्री मुळे विद्यार्थी पटसंख्या वाढताना दिसतं आहे.

दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट स्कूलच्या डिजिटल बोर्डावरून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डिजिटल बोर्डाची भव्य-दिव्यता पाहून विद्यार्थी भारावले.

स्मार्ट स्कूलमध्ये उपलब्ध सुविधा

- स्मार्ट क्लासरूममध्ये डिजिटल अभ्यासक्रम.

- डेस्कटॉप संगणक, अॅण्ड्राईड टॅब्लेब, सीसीटीव्ही कॅमेरे.

- क्लाऊड आधारित शाळा प्रशासन प्रणाली.

- ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, बायोमेट्रिक उपस्थिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT