NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: 2 महिने उलटले तरी घंटागाडी चौकशीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात! कारवाईची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

NMC News : पंचवटी व सातपूर विभागातील घंटागाडी ठेक्यासंदर्भातील तक्रारींवरून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने दोन महिने उलटूनही अद्यापही अहवाल सादर केलेला नाही. (NMC Even after 2 months Ghanta Gadi inquiry report still in bouquet Waiting for action nashik)

त्यामुळे गुलदस्‍त्यात असलेला अहवाल बाहेर पडून अटी व शर्ती न पाळणाऱ्या ठेकेदारांवर कधी कारवाई होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान गुलदस्त्यातील अहवालामागे समिती प्रमुखांनी बैठक बोलावूनही सदस्य गैरहजर राहत असल्याचे कारण सांगितले जात असून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचा आरोप होत आहे.

महापालिकेचे मार्च महिन्यात प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घंटागाडी संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. सातपूर व पंचवटी भागातील घंटागाडी संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारींचा समावेश आहे.

अनियमित घंटागाडी येणे, नियोजित मार्गावर घंटागाडी न धावणे, घंटागाडीवर जीपीएस न बसविणे, कचरा विलगीकरण न होणे यासंदर्भातील तक्रारींचा समावेश आहे. पंचवटी व सातपूर विभागात अडीच टन घंटागाडी ऐवजी सहाशे किलो क्षमतेच्या घंटागाड्या चालविणे.

अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. नियमानुसार अडीच टन गाडी नसेल तर दररोज दहा हजार रुपये दंड करण्याची अट करारामध्ये नमूद करण्यात आली आहे. तर जीपीएस नसेल तर दररोज एक हजार रुपये दंड ठेकेदारांकडून वसूल करण्याच्या सूचना आहे.

मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमांचे उल्लंघन होत असताना देखील दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी सातपूर व पंचवटी विभागातील घंटागाडी ठेकेदारा संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर दहा कोटी रुपयांचे देयके रोखून धरण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र ती देयके तातडीने अदा करण्यात आली. एकूणच तक्रारींच्या अनुषंगाने तत्कालीन आयुक्त गमे यांनी घंटागाडीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे या चौघांची समिती गठित केली.

निविदेतील अटी व शर्ती प्रमाणे काम होत आहे की नाही याची तपासणी करून आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु समिती नियुक्त केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कुटे आठ दिवसांच्या रजेवर गेल्या.

त्यानंतर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त पदावर बदली झाल्याने श्री. गमे यांच्याकडेच प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार कायम राहिला. सध्या प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार भाग्यश्री बानायत यांच्याकडे आहे.

"घंटागाडी ठेक्याच्या अनियमिततेत संदर्भात प्राप्त तक्रारीनुसार चौकशी सुरु आहे. चौकशीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून लवकरच अहवाल सादर केला जाईल."

- उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT