nmc esakal
नाशिक

NMC Healthy Child Campaign : बालकांच्या सुदृढतेसाठी महापालिकेचे विशेष अभियान

किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेकडून शहरात जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान सोमवार (ता. ६) पासून राबविण्याचा निर्णय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी या अभियानांतर्गत होईल.

यासंदर्भात शुक्रवारी (ता. ३) महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्सची बैठक झाली. (NMC Healthy Child Campaign special campaign of Municipal Corporation for health of children nashik news)

महापालिकेसह जिल्हा आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी तसेच आयएमए, आयएपी संघटना या सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असण्याची सूचना आयुक्तांनी केली.

महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी अभियानाची व्याप्ती, अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

बालक आणि किशोरवयीन मुला- मुलींच्या आरोग्य तपासणीबरोबरच आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार केले जाणार आहेत. सुरक्षित आणि सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले जाणार आहे. आठ आठवड्याच्या कालावधीत प्राथमिक तपासणी होणार आहे.

तपासणी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, औषध निर्माण अधिकारी, आशा आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश असणार आहे. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

बैठकीला मनपा उपायुक्त नितीन नेर, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, मनपाचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गरुड, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. योगेश कोशीरे डॉ. विनोद पावसकर, डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम बैठकीला उपस्थित होते.

येथे होईल तपासणी

शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, खासगी शाळा, आश्रमशाळा, अंधशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खासगी नर्सरी, बालवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथ आश्रम, समाजकल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे या ठिकाणी तसेच शाळा बाह्य मुले- मुली यांचीही तपासणी होणार आहे. जन्मजात दोष, कमतरता, आजार, विकासात्मक विलंब असे तपासणीचे निर्देशांक असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT