NMC News esakal
नाशिक

NMC News: जमिनीवरच्या सर्वेक्षणात छिद्र मोजणार! शहरातील भूजल पातळीचा समतोल राखण्यासाठी नियोजन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील वस्तीपासून रस्त्यापर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मॅपिंग सुरू करण्यात आले.

पहिल्या टप्प्यातील ड्रोन सर्वे पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरच सर्वेक्षण सुरू करताना पाण्याचा वाढता वापर व त्यातून भूजलाची खालावणाऱ्या पातळीचा अभ्यास करण्यासाठी जमिनीला कृत्रिमरीत्या पाडण्यात आलेल्या छिद्रांची माहिती संकलित करून राज्य शासनाला सादर केली जाणार आहे.

जेणेकरून भूगर्भातील पाण्याचा किती प्रमाणात वापर होतो याची माहिती राज्य शासनाला उपलब्ध होवू शकेल. (NMC Holes will be measured in ground survey Planning to maintain ground water level balance in city nashik)

राज्य शासनाने २०१९ पासून शहर विकास आराखडा तयार करताना जीआयएस (जिओग्राफीकल मॅपिंग सिस्टम) मॅपिंग करण्याच्या सूचनच दिल्या आहेत. २०१७ मध्ये तयार करण्यात आलेला शहर विकास आराखड्याचा नकाशा द्विस्तरीय पध्दतीचा आहे.

शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे शहरातील रस्त्यांचे जमीन योजना (लॅण्ड प्लॅन ॲन्ड लॅण्ड शेड्यूल) प्रमाणिकृत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका खासगी संस्थेला काम दिले.

महापालिका हद्दीत जवळपास २७० चौरस किलोमीटर क्षेत्राचे जीपीएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील मालमत्ता, रस्ते आदींची माहिती संकलित करून जीआयएस मॅपिंगवर टाकण्यात आली.

आर्टिलरी सेंटर, पोलिस अकादमी, सीएनपी व आयएसपी, विभागीय आयुक्त कार्यालये, केंद्रीय कार्यालये या सुरक्षेच्या स्थळांचेही मॅपिंग पूर्ण झाले. आता ड्रोनद्वारे झालेले जिओग्राफीकल सर्वेक्षणाची उलट पडताळणी केली जाणार आहे. पंचवटी विभागातील मानूर व पंचक या गावापासून पडताळणीला सुरवात केली जाणार आहे.

टप्प्याटप्याने महापालिका हद्दीतील सर्वच गावठाणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते, जमिनीचे ले- आउट, उद्याने, विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर, एमएनजीएलची पाइपलाइन, ड्रेनेज पाइप, विहीरी, टेलिफोन जाळे, रस्त्यांची लांबी व रुंदी, प्लॉटची लांबी व रुंदी, अतिक्रमण, इमारतींच्या फूट प्रिंट, ॲमेनिटी स्पेस आदींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल तसेच महापालिकेची स्वतःची लॅण्ड बॅंकदेखील तयार होणार आहे.

जमिनींच्या छिद्रांची माहिती

शहरात मोठ्या प्रमाणात जमिनींना छिद्रे पाडली जात आहे. अर्थात बोअरवेलच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याचा उपसा होत आहे. बोअरवेल तयार करण्यासाठी कुठली नियमावली नाही. स्वमालकीच्या जागेत हवे तसे बोअरवेल तयार केले जात आहे.

परिणामी नैसर्गिक समतोल ढासळताना दिसत आहे. नाशिक शांत, सुंदर व पर्यावरणपूरक शहर आहे. त्यामुळे या शहराचा विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होवू नये याचीदेखील काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बोअरवेलची माहिती तत्काळ उपलब्ध होण्यासाठी माहिती संकलित केली जाणार आहे.

"जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून सर्व मिळकतीचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून मानूर व पंचक या दोन गावांमधील जमिनीवरचे सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. जमिनीवरचे सर्वेक्षण करताना बोअरवेलसारख्या छोट्या बाबींचीदेखील माहिती संकलित केली जाणार आहे."- हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT