नाशिक : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयामार्फत विविध कराचा भरणा करताना मागील काही वर्षात जवळपास २३ लाख ४५ हजार रुपयांचा हिशोब लागत नसल्याने या कराचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करून एका महिला रोखपालाला लेखा परीक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (NMC Misappropriation of 23 lakhs of municipal funds nashik)
नाशिक महापालिकेचे सहा विभाग असून, या सहा विभागीय कार्यालयामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी अशा अन्य शुल्काचा भरणा केला जातो. विभागीय कार्यालयांमध्ये महापालिकेचे रोखपाल नियुक्त करण्यात आले आहे.
सिडको विभागीय कार्यालयामध्ये विविध करांचा भरणा झाल्यानंतर तो भरणा बँकेत जमा न करता खासगी कामासाठी वापरल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले.
आतापर्यंत २३ लाख ४५ हजार रुपयांचा कराचा हिशोब लागत नसल्याने त्या निधीचा अपहार झाल्याचे गृहीत धरून संबंधित महिला रोखपालाला नोटीस बजावण्यात आली आहे.
कार्यकाळात विविध कराचा २३ लाख ४५ हजाराचा भरणा झाल्याने निलंबित का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील नाशिक रोड विभागीय कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा न झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
त्याचबरोबर विविध कर विभागातील महापालिका मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिलेकडून अद्यापही जवळपास पाच लाख रुपयांची वसुली केली जात असून, चौकशीदेखील प्रलंबित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.